सतत गाणी ऐकण्यासाठी, कॉल वर बोलण्यासाठी, मोबाईलमध्ये चित्रपट बघण्यासाठी अशा अनेक विविध कामांसाठी आपण हेडफोन वापरतो. हेडफोन हे आपण चालताना काम करताना ड्राईव्ह करताना वगैरे मोबाईलला कनेक्ट करून कानात हेडफोन घालून आपण गाणी ऐकू शकतो किंवा कॉलवर बोलू ही शकतो. आजच्या या प्रगत जगामध्ये नवनवीन उपकरणे तयार केली जात आहेत. या उपकरणांचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत.

सतत हेडफोन घातल्याने कानांना व सोबतच डोक्याला देखील याचा त्रास होतो. या हेडफोनचा अत्यंत गंभीर परिणाम आपल्यावर होत असतो. ज्यामुळे कानदुखी, बहिरेपणा, झोप न येणे, डोकेदुखी असे त्रास होतात. काही वेळेस हे त्रास मृत्यूचे कारण देखील ठरतात. त्यामुळे हेडफोनचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक असते. या हेडफोनमुळे कोणकोणत्या प्रकारचा त्रासांना आपल्यलाला सामोरे जावे लागते याचा आढावा आज आपण घेणार आहोत.

कमी ऐकू येणे – आपल्या ५ ज्ञानेंद्रियांपैकी एक महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे कान आहे. कानाचे मुख्य काम ऐकणे आहे. कानाचे काम ऐकणे हे असले तरी किती प्रमाणात आवाज ऐकायचा याची सीमा ठरलेली असते. आपल्या कानाची ऐकण्याची क्षमता ही ९० डेसिबल पर्यंत आहे. पण आपण जर सातत्याने कानात हेडफोन घालून गाणी ऐकत राहिलो तर आपल्याला कानाने ऐकू येण्याची क्षमता ही हळू हळू ४० ते ५० डेसिबल पर्यंत येते. ज्याने आपल्याला बहिरेपणा येऊ शकतो. त्यामुळे काही जणांशी बोलताना आपल्याला जोरात बोलावे लागते.

कानाच्या पडद्यावर परिणाम – सातत्याने कानात हेडफोन घालून संगीत ऐकण्याच्या सवयीमुळे कानाच्या पडद्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. सातत्याने जोरदार आवाज कानाच्या पडद्यावर पडत असल्याने पडदा व्हायब्रेट होतो. ज्यामुळे कानाचा पडदा फाटण्याची शक्यता असते.

इतर आजारांना आमंत्रण – कानात हेडफोन घालून मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने आपल्या कानांसोबत आपल्या हृदयावर देखील याचा वाईट परिणाम होत असतो. एवढंच नव्हे तर वय झाल्यानंतर कर्करोगासारख्या आजाराचे कारण देखील हेडफोन ठरू शकतो.

बुद्धीवर परिणाम – हेडफोन लावून सातत्याने गाणी ऐकल्याने त्याचा परिणाम हा आपल्या कानाच्या पडद्यासोबत आपल्या डोक्यावर, बुद्धीवर होत असतो. गाण्यांच्या व्हायब्रेशनमुले अनेकदा मानसिक आजारांनी लोक ग्रासतात. सोबतच यामुळे एका वेळी दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता माणूस हरवून बसतो. यासोबतच डोकेदुखी, झोप न येणे, विसरभोळेपणा, थिरथिरेपणा अशा प्रकारचा त्रास संभवतो. सातत्याने हेडफोन वापरल्याने चिडचिडेपणा वाढतो. अती हेडफोन वापरामुळे निद्रानाशाचा विकार जडू शकतो.

संसर्गाची भिती – जर आपण कोणाचा ही हेडफोन वापरला तर त्यामुळे आपल्याला संसर्ग होण्याची भिती असते. त्यामुळे कोणतीही ऍलर्जी व संसर्ग होण्यापासून वाचायचे असेल तर स्वतःचे हेडफोन वापरावे. पण जर आपण इतर कोणाचे हेडफोन वापरत असू तर आधी ते साफ करून घ्यावे मगच त्याचाहा वापर करावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *