‘व्हिटॅमिन सी’चा आपल्या आरोग्याला योग्य प्रमाणात पुरवठा होणे अतिशय आवश्यक आहे. या जीवनसत्त्वास एस्कॉर्बिक अ‍ॅसिड असंही म्हटलं जातं. फळे आणि भाज्यांच्या सेवनाद्वारे आपल्या शरीराला नैसर्गिक स्वरुपात ‘व्हिटॅमिन सी’ मिळते. संत्रे, स्ट्रॉबेरी, कीवी, ब्रोकोली किंवा पालक यासारख्या फळ आणि भाज्यांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा भरपूर असते. कोरोना महामारीच्या कठीण काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आंबट फळांचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहे.

यामुळे संसर्गाविरोधात लढण्यास आपल्याला मदत मिळते. शरीरात या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाल्यास आजारांची लागण होण्याची शक्यता असते. सी जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही रोग होतो. परंतु याच सी जीवनसत्वाचे अतिसेवन केल्यास दुष्परिणाम देखील आपल्या शरीरावर होऊ शकतात.

जर आपण नियमित एक हजार मिलीपेक्षा अधिक प्रमाणात ‘सी जीवनसत्त्वाचे’ सेवन केले तर जुलाब, उलटी, छाती जळजळणे, पोटदुखी, डोकेदुखी आणि निद्रानाश यासारख्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. साधारणतः महिलांनी ७५ मिलीग्रॅम आणि पुरुषांनी ९० मिलीग्रॅम या प्रमाणात ‘सी जीवनसत्त्वाचे’ नियमित सेवन करावे.

कोलेजनचे उत्पादन वाढवण्यामध्ये व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सांध्यांचे आरोग्य सी जीवनसत्त्वामुळे निरोगी राहते. शरीरावर झालेल्या जखमा लवकर भरून काढून त्या जखमा लवकर ठीक होण्यास मदत करते. याव्यतिरिक्त अन्य शारीरिक कार्यप्रणाली सुरुळीत सुरू राहण्यासाठी ही सी जीवनसत्त्व आवश्यक आहे.

र*क्तदाब नियंत्रणात ठेवते – सी जीवनसत्त्व र*क्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊ देत नाही आणि हृदयाला योग्य पद्धतीने र*क्तपुरवठा होण्यास मदत करते. यामुळे र*क्तदाबाची समस्याही नियंत्रणात राहण्यास मदत होते. वयोवृद्धांमधील सिस्तोलिक ब्ल*ड प्रेशरचे प्रमाण सी जीवनसत्त्वाच्या सेवनामुळे कमी होते. यामुळे स्ट्रोक किंवा हृदयाशी संबंधित अन्य समस्यांचाही धोका कमी होतो.

ताण कमी होतो – तणाव व्यक्तीला फार कमजोर करतो व त्यामुळे अनेक समस्या उदभवतात. शरीरामध्ये सी जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी झाल्यास ताणतणावाशी संबंधित समस्यांचे प्रमाण वाढते. सी जीवनसत्त्वामध्ये असणारे पोषक तत्त्व तणावाची संवेदनशील असतात. योग्य प्रमाणात सी जीवनसत्त्व युक्त आहाराचे सेवन केल्यास तणाव कमी होण्यास मदत मिळते आणि आरोग्य निरोगी देखील राहते.

कॉलेजन वाढवते – कॉलेजन एक असा पदार्थ आहे जो स्वतःहून आपल्या शरीरात तयार होतो. कॉलेजन मुले त्वचेचे आरोग्य निरोगी राहते. सी जीवनसत्त्व हे कॉलेजन वाढवण्यासाठी मदत करते. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते.

लोहाची कमतरता भरून काढते – शरीराची कार्यप्रणाली सुरळीत चालण्यासाठी लोह हे शरीरासाठी फार महत्त्वाचे असते. लोह हे शरीरातील लाल र*क्त पेशींना र*क्तपुरवठा करते. सी जीवनसत्त्व आहारातून लोह शोषण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरात लोहाची कमतरता भासत नाही. लोहाचा योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यास शरीरामध्ये र*क्ताची कमतरता निर्माण होत नाही.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते – कोरोना महामारीच्या काळात सी जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचे महत्त्व प्रत्येकालाच समजले असेल. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सी जीवनसत्त्व फार महत्त्वाचे असते. सी जीवनसत्त्वाच्या सेवनामुळे शरीरात पांढऱ्या र*क्तपेशी वाढतात. ज्या संसर्गाविरोधात लढण्याचे कार्य करतात आणि आपल्या शरीराचे आजारांपासून संरक्षण देखील करतात.

सी जीवनसत्त्व आरोग्यासाठी पोषक आहे. पण एखाद्या गोष्टीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते शरीरासाठी अपायकारक ठरते. त्यामुळे सी जीवनसत्त्वाचे अतिसेवन केल्यास आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *