सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस आधी अस्सं घडलं होतं, सिद्धार्थ पिठानीने दिली सी. बी. आय. ला महत्वाची माहिती !

130920

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*ला अडीच महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. सध्या या प्रकरणाबाबत वेगवेगळे खुलासे होताना दिसतात. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयची टीम करत आहे. सीबीआई ने आता पर्यंत सुशांतचा फ्लैटमेट सिद्धार्थ पिठानी, सैमुअल मिरांडा, नीरज आणि सुशांतच्या इतर स्टाफ ची चौकशी केली आहे. यामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा झाला. नुकतेच सिद्धार्थ ने सुशांत चा मृत्यू पूर्वीच्या संपूर्ण दिवसाचा घटनाक्रम सांगितला.
१४ जून ला मुंबईतील वांद्रे मधील राहत्या घरी सुशांत सिंह राजपूतचा मृ त दे ह आढळला. त्यावेळी सुशांतच्या घरी सिद्धार्थ सोबत सुशांतचा कूक आणि हाऊस हेल्पर उपस्थित होते. त्यामुळे सीबीआयने त्यांची सर्वप्रथम चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांना ८ जून ते १४ जून दरम्यान काय काय घडले ते विचारले गेले. सुशांतच्या मृत्युपूर्वी च्या दिवशी म्हणजेच १३ जूनला काय काय घडले याबाबत आता सिद्धार्थ पिठाणे खुलासा केला.

मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थने सीबीआयला सांगितले की, १३ जूनला सुशांतला काही बिल भरायचे होते. ते बिल त्याने त्याच्या फोनवरून भरले. यामध्ये सिद्धार्थने त्याची मदत केली होती. त्यानंतर सुशांत मॅंगो शेक पिला पण जेवला नाही. सिद्धार्थने पुढे सांगितले की १२ जूनला सुशांतची बहिण मितू दीदी तिच्या घरी परत गेली. मितू दीदीला तिच्या मुलीची आठवण येत असल्यामुळे ती निघून गेली होती. त्यानंतर १४ जूनला सुशांत चा मृ त दे ह आढळला.
सध्या गेले तीन दिवस सीबीआय अभिनेत्री रिया चक्रवर्ती ची चौकशी करत आहे. त्यानंतर सुशांत ची बहिण मीतू सिंह ची चौकशी केली जाईल. सध्यातरी सुशांतच्या परिवारातील फक्त मीतुला बोलावले आहे. त्यानंतर सुशांतची दुसरी बहीण प्रियांका व तिचा पती याची सुद्धा चौकशी होऊ शकते. जर या चौकशी मधून समाधान कारक काही मिळाले नाही तर सुशांतच्या बहिण आणि रिया, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंह, दीपेश यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारले जातील.
सीबीआय द्वारा केल्या गेलेल्या चौकशीमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीने अनेक गोष्टी सांगितल्या. मात्र रियाने दिलेल्या उत्तरांनी सीबीआय समाधानी नाही.
त्यामुळे रिया, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंह, दीपेश यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारले जातील. रिया सोबतच याप्रकरणी तिच्या भावाची पण चौकशी केली जात आहे. मनी लॉ न्ड्रिं ग सारखी गोष्ट समोर आल्यावर आता ईडी आणि ड्र*ग्स अँगल मुळे ना र्को टि क्स विभाग पण तपासाला लागला आहे.