शेतकरी म्हटले की त्याचे काबाडकष्ट त्याची मेहनत या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येतात. शेतात राबराब राबून सुद्धा शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव मिळत नाही या बातम्या सतत टीव्ही, वृत्तपत्र ,सोशल मिडीया माध्यमातून फिरत असतात. शेतकऱ्याला कधी दुष्काळाला सामोरे जावे लागते तर कधी अवेळी पावसाळ्याला. या सर्व अडचणीतून मात करत शेतकरी थोडेफार पैसे कमावतो.
या शेतकर्यांमधून असाच एक शेतकरी नशीबवान निघाला. केवळ चार एकर जमिनीतून त्याने साडेबारा लाख रुपयांच्या कोथिंबिरीचे उत्पादन केले. सोशल मीडिया हे असे एक माध्यम आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट व्हायरल झाली की ती अशी प्रसिद्ध होते की एखादेवेळेस त्या प्रसिद्धीचे कौतुक वाटते तर कधीकधी त्या प्रसिद्धीचा म न स्ता प होतो. त्यामुळे एखादी गोष्ट व्हायरल होण्यापूर्वी लक्ष द्यावे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक शेतकरी डोक्यावर पैशांच्या नोटा असलेले गा ठो डे घेऊन उभा असलेला दिसतो. या फोटोखाली तो शेतकऱ्याला चार एकर कोथिंबिरी साठी साडेबारा लाख रुपये मिळाल्याची माहिती दिली आहे.
ही खोटी बातमी एका वृत्तपत्राने व्हायरल केल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्रास सहन करावा लागला. याबाबत अधिक माहिती मिळवली असता असे लक्षात आले यामधील माहिती जरी खरी असली तरीही त्या माहिती सोबत दिला गेलेला फोटो हा कोणा भलत्याच व्यक्तीचा आहे.
झाले असे की, सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील शेतकरी विनायक हेमाडे यांनी चार एकरात कोथिंबिरीचे उत्पादन घेऊन कोथींबीरीच्या दरात चांगली वाढ झाल्यामुळे १२ लाख ५१ हजारांचा सौदा केला होता. त्या बदली त्यांना धनादेश मिळाला मात्र सोशल मीडियावर त्यांच्याऐवजी भलत्याच व्यक्तीचा बातमीसह फोटो छापून आला. त्यामुळे हेमाडे यांना भलताच म न स्ता प सहन करावा लागला.
त्यामुळे त्या दिवशी हेमाडे व त्यांच्या कुटुंबीयांना विचारपूस करण्यासाठी दिवसभर फोन येत होते. याशिवाय त्यांचे मित्र ग्रामस्थ यांनी देखील त्यांची वैयक्तिक भेट घेऊन विचारपूस केली. सकाळ या वृत्तपत्रात ४ सप्टेंबर रोजी हेमाडे यांच्या कोथिंबीरीच्या दराची माहिती प्रसिद्ध झाली होती मात्र काही दिवसांनी सोशल मीडियावर ही बातमी भलत्याच व्यक्तीचा फोटो लावून व्हायरल करण्यात आली.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !