टीव्ही अभिनेत्री दिव्या अग्रवाल सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. दिव्याने तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिचा जुना मित्र अपूर्व पाडगावकरसोबत साखरपुडा केला होता. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच तिचा अभिनेता वरुण सूडसोबत ब्रेकअप झालेला. त्यामुळे अचानक साखरपुडा केल्यामुळे तिच्या व वरुणच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
काही दिवसांपूर्वी दिव्याने सोशल मीडियावर प्रश्नोत्तरांचे एक सेशन घेतले. त्यामध्ये तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एका चाहत्याने आपल्या मर्यादा ओलांडत दिव्याला एक अतिशय वैयक्तिक प्रश्न विचारला, विशेष म्हणजे त्या प्रश्नाचे दिव्यानेही उत्तर दिले.

चाहत्याने मर्यादा ओलांडली – चाहत्याने दिव्याला विचारले – तू व्हर्जिन आहेस का? या वैयक्तिक प्रश्नाचे उत्तर देण्यास दिव्याने संकोच केला नाही आणि तिने हो म्हटले. यानंतर, एका चाहत्याने दिव्याकडून रिलेशनशिपचा सल्ला मागितला, तेव्हा ती म्हणाली – जेव्हा तुम्ही तुमचे आयुष्य कोणाशी तरी शेअर करण्यास तयार असता तेव्हा त्यावर खूप काम करावे लागते. पण नंतर प्रयत्न न करता सगळे घडत जाते. एका मुलाखतीत दिव्याने वरुणसोबतच्या ब्रेकअपबद्दलही सांगितले होते. ती म्हणाली की तो काळ माझ्यासाठी सर्वात कठीण होता आणि त्यातून सावरण्यासाठी मला बराच वेळ लागला.

वरुण आणि दिव्याने टीव्ही शो Ace of Space आणि Splitsvilla मध्ये एकत्र काम केले होते. यादरम्यान, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे, परंतु 2022 मध्ये दोघांनी सोशल मीडियावर आपला ब्रेकअप झाल्याचे चाहत्यांना कळवले. ती बातमी वाचून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

अशातच मध्यंतरी जेव्हा वरुणची बहिण अक्षिता सूडने सोशल मीडियावरुन दिव्याकडे त्यांचे खानदानी दागिने परत मागितले. हे दागिने वरुणच्या कुटुंबाने तिला ती वरुणसोबत नात्यात असताना दिले होते. वरुणच्या बहिणीच्या पोस्टचे उत्तर देताना दिव्याने दागिन्यांचा फोटो शेअर करत मी हे दागिने परत करत आहे. जे मी मागितलेही नव्हते आणि घातलेही नव्हते असे म्हटले.

दिव्याचा होणारा नवरा अपूर्व पाडगावकर हा व्यवसायिक आहे. त्याची स्वताची हॉटेलची चैन आहे. वरुण सूडच्या आधी दिव्या प्रियांक शर्मासोबत नात्यात होती. स्प्लिट्सव्हिला मध्ये दोघांची जवळीक वाढली होती. त्यानंतर बिग बॉसमध्ये गेल्यावर प्रियंकची बेनाफशासोबत जवळीक वाढल्याचे पाहून दिव्याने सार्वजनिकरित्या प्रियांकसोबत ब्रेकअप केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *