आयुष्यात मोठे काहीतरी व्हायचे असेल तर आपण ज्यांनी शून्यातून जग निर्माण केले अशांच्या गोष्टी वाचाव्यात. या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात. पण तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीने शून्यातून जग निर्माण करून उच्च स्थानी पोहोचल्यावर त्या व्यक्तीला आयुष्यातील वाईट काळ अनुभवावा लागला असे कधी ऐकले आहे का ? असा एक व्यक्ती आपल्या भारतात आहे. आज आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत. ही व्यक्ती इतर कोणी नसुन कौन बनेगा करोडपती सीजन ५ चा विजेता सुशीलकुमार आहे.
२०११ च्या कौन बनेगा करोडपती या शोमध्ये सुशिलकुमार स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या शोमध्ये त्याने ५ करोड रुपये जिंकले. आता तुम्ही म्हणाल की ५ करोड जिंकून सुद्धा सुशीलकुमारने आयुष्यात असे काय अनुभवले जेणेकरून त्याला आता त्याचा प श्चा ता प होत आहे. या शोचा विजेता बनल्यावर स्वतःच्या आयुष्यात आलेला वाईट काळ सुशील कुमारने फेसबूक मार्फत शेअर केला.
सुशिलकुमारने त्याच्या फेसबुकवर लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सेलिब्रिटी बनल्यावर त्याला काय वाईट अनुभवायला मिळाले याबद्दल सांगितले. सुशील कुमारने लिहिले, केबीसी जिंकल्यानंतर चा काळा माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता. शो जिंकल्यावर मला अनेक कार्यक्रमांमध्ये येण्यासाठी आमंत्रण मिळायचे त्यामुळे माझे शिक्षण सुटले. सुशील पुढे म्हणाला की त्याने अनेक बिजनेस मध्ये पैसे लावले मात्र ते सगळे पैसे डुबले. केबीसी जिंकल्यावर मी खूप दा न शू र झालो होतो आणि मला गु प्त दा न करण्याची सवय लागली.
त्याकाळी माझा काही चालू लोकांसोबत संबंध आला जे मला चालता बोलता लुटू लागले. त्यावेळी मी एका महिन्यात ५० हजाराहून अधिक पैसा दान करायचो. या सर्व गोष्टीचा फरक माझ्या परिवारावर होता. माझे माझ्या पत्नीशी संबंध खराब होऊ लागले होते. त्यावेळी ती मला सतत म्हणायची की तुम्हाला कोण बरोबर कोण चूकीचे याची पारख नाही. त्यावेळी मला सतत वाटायचे की माझा परिवार मला समजून घेत नाही त्यामुळे आमच्यात सतत भांडणे व्हायची.
त्यानंतरच्या काळात मी दिल्लीमध्ये काही गाड्या घेतल्या व एका मित्राच्या साथीने त्या चालावणे सुरू केले त्यामुळे मला दर महिना काही दिवसांसाठी दिल्लीला यावे लागायचे. त्या दरम्यानच्या काळात माझी ओळख मिडीयाचा अभ्यास करणाऱ्या काही मुलांशी झाली. मला त्यांच्या सोबत राहणे आवडू लागले. त्यांच्याकडे एवढे ज्ञान होते की मला सतत वाटायचे त्यांच्या इतके मला काहीच माहित नाही. त्या मुलांसोबत राहून मला दारू व सिग्रेट ची सवय लागली.
सुशीलने पुढे लिहिले, जेव्हा जेव्हा मी त्यांच्यासोबत बसायचो त्यावेळी दारू आणि सिगारेट घ्यायचो. एक काळ असा होता जेव्हा मी सात दिवसांसाठी त्यांच्यासोबत राहायचो तेव्हा सातही दिवस मी न शे त डुबलेला असायचो. त्यानंतर घरी परतल्यावर पत्नीसोबत खूप भांडणे व्हायची. एक दिवस असेच पत्नी सोबत भांडण झाल्यावर मी घराबाहेर फिरण्यासाठी पडलो त्या वेळी मला एका पत्रकाराचा फोन आला मी त्याच्या सोबत काही वेळ बोललो, त्यावेळी तुम्ही आता काय करत आहात असा प्रश्न त्याने मला विचारला. त्याचा तो प्रश्न ऐकून मला खूप वाईट वाटले मी त्याला म्हणालो की माझे सगळे पैसे संपले आहेत. आता माझ्याकडे दोन गाई आहेत त्यांचे दूध विकून मी घर चालवतो.
त्यानंतर ही बातमी इतकी व्हायरल झाली की माझ्यासोबत माझ्या पैशांसाठी असणारे माझे चालू मित्र माझ्यापासून लांब झाले. मला कार्यक्रमांमधून बोलावणे बंद झाले. तरीही मला असे वाटले की आता मला माझ्यासाठी वेळ मिळेल परंतु मी चुकीचा होतो. घरात पत्नीसोबत भांडणे वाढू लागले आणि एके दिवशी रागात पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली. परिस्थिती घ ट स्फो टा प र्यंत गेली होती. त्यावेळी मला वाटले की आता या वेळेस इथून निघून जाण्यात ठीक राहील. यासाठी मी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मुंबईत आलो. मला वाटले इथे येऊन मी एक दिग्दर्शक होईन. एका मोठ्या प्रोडक्शन हाऊस मध्ये कामाला लागलो मात्र तेथे माझे मन रमत नव्हते. मुंबईत मी माझ्या एका गीतकार मित्रा सोबत राहत होतो. लॅपटॉप वर सिनेमे पाहून व वेगवेगळी पुस्तके वाचून पूर्ण दिवस घालवायचो.
त्यावेळी पुस्तके वाचताना सिगरेटचा अख्खा बॉक्स मी संपवायचो. माझी पूर्ण खोली धुराने भरलेली असायची. त्यावेळी मला जाणवले की मी मुंबईत दिग्दर्शक बनण्यासाठी आलो नाही तर मी सत्यापासून पळत इथे आलो आहे. खरे सुख हे आपले आवडते काम करण्यातच मिळते. गर्वाला कधीच शांत केले जाऊ शकत नाही. त्यामुळे मोठे होण्यापेक्षाही एक चांगले माणूस होणे कधीही उत्तम. आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सामावलेला असतो त्यामुळे जितके होईल तितके देश व समाजाचे भले केले पाहिजे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टींची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. सर्वात शेवटी सुशील ने लिहिले, आयुष्यात गरजा या कमीत कमी ठेवल्या पाहिजेत. आपल्या गरजा पूर्ण होऊ शकतील एवढेच कमवा आणि बाकीचा उरलेला वेळ हा पर्यावरणासाठी कोणतीही छोटी-मोठी कामे करण्यात घालवा.