बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा भारतातील सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. सलमान खानचा कोणताही चित्रपट असतो तो बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करतोच. शिवाय सलमान खानला बॉलीवूड मध्ये गॉडफादर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अनेकांची सलमान खान सोबत काम करावे अशी मनोमन इच्छा असते. बॉक्स ऑफिस वर सलमान खान चे चित्रपट जबरदस्त हिट होतात. बॉलीवूड वर सलमान खानचा एक प्रकारचा दबदबा आहे. सलमान खानच्या दबंगगिरीला बॉलिवूडमध्ये अनेक जण घाबरतात. पण तुम्हाला माहित आहे का सलमान खान कुणाला घाबरतो?
सलमान खान इतर कोणी नाही तर बॉलिवूडची हवाहवाई गर्ल श्रीदेवीच्या नावाने घाबरायचा. सध्या जरी बॉलीवूड मध्ये सलमान खानच्या नावाचा बोलबाला असला तरीही सलमान खानच्या करिअरमध्ये एक असाही काळ होता जेव्हा सलमान खान श्रीदेवी सोबत काम करायला घाबरायचा. याबाबतचा खुलासा सलमान खान ने स्वतः एका इंटरव्ह्यूमध्ये केला होता, सलमान म्हणाला होता की त्याला श्रीदेवी सोबत काम करायला भीती वाटायची. कारण त्यावेळी श्रीदेवीचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक चित्रपटातील नायकावर जास्त लक्ष द्यायचे नाहीत. त्याकाळी श्रीदेवीची प्रेक्षकांवर इतकी जादू होती की प्रेक्षक चित्रपटगृहात फक्त श्रीदेवीला पाहण्यास जायचे.
त्याकाळी ज्या चित्रपटांमध्ये श्रीदेवी असायची त्या चित्रपटातील दुसऱ्या कलाकारांना प्रेक्षक इग्नोर करायचे कारण त्यांच्या मनात फक्त श्रीदेवीच असायची. सलमान खानने म्हटले की तो त्या काळी श्रीदेवी सोबत काम करायला खूप घाबरायचा. ज्यावेळी सलमान खान बॉलीवूड मध्ये आला त्यावेळी श्रीदेवी बॉलिवूडची सुपरस्टार होती.
श्रीदेवी सोबत सलमान खान ने ‘चांद का तुकडा’ आणि ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. चंद्रमुखी १९९३ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि चांद का तुकडा १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र हे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले होते. सलमानच्या या दोन्ही चित्रपटांचे टायटल श्रीदेवी वर आधारित होते. त्या चित्रपटांमध्ये श्रीदेवीची भूमिका जास्त दमदार होती त्यामुळे सलमान खान च्या तुलनेत श्रीदेवीला जास्त फि मिळाली होती. एकदा सलमान खानने श्रीदेवी सोबत स्टेट शो केला होता त्यावेळी श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन यांचे मोठे फोटो पोस्टर वर लावले होते तर सलमान खानचा एका छोट्या बॉक्समध्ये फोटो लावला होता.
श्री देवी बद्दल तर सर्वजण जाणतात कि ती ८० व ९० च्या दशकाची सुपरस्टार होती. चांदनी, चालबाज, नगीना, खुदा गवाह, हिम्मतवाला, मिस्टर इंडिया आणि जुदाई यांसारख्या हिट चित्रपट देणाऱ्या श्रीदेवी सोबत काम करणारे हिरो देखील त्या काळी साईड लाईनमध्ये असायचे. तीन दशकांच्या फिल्मी करिअरमध्ये श्रीदेवीने २०० चित्रपटांमध्ये काम केले. त्याकाळी श्रीदेवी च्या नावावर चित्रपट जास्त विकायचे. याच कारणामुळे त्या काळी चित्रपटातील हिरो तिच्यासोबत काम करण्यास घाबरायचे. हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीने तिच्या करिअरची सुरुवात १९७९ मध्ये आलेल्या सोलहवां सावन या चित्रपटामधून केली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. त्यानंतर १९८३ मध्ये पुन्हा एकदा श्रीदेवीने हिम्मतवाला या चित्रपटा मार्फत बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. या चित्रपटानंतर श्रीदेवीने मागे वळून पाहिले नाही. ८० आणि ९० दशकात श्रीदेवीचे जादू इतकी होती की फक्त अभिनेत्रीच नव्हे तर अनेक अभिनेते देखील श्रीदेवी मुळे इनसिक्योर फील करायचे.
बॉलिवूडमध्ये अभिनेत्याला अभिनेत्री पेक्षा जास्त फि मिळते हे सर्वानाच माहीत आहे. मात्र ८० व ९० च्या दशकात त्याकाळचे निर्माता दिग्दर्शक श्रीदेवी हा चित्रपट हिट करण्याचा सर्वात मोठा फॉर्मुला मानायचे. त्याकाळी श्रीदेवी ही अशी एक अभिनेत्री होती जिला सर्वात पहिल्यांदा फि म्हणून एक करोड रुपये मिळाले होते.