पतौडी खानदानाची नात आणि अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री अमृता सिंहची मुलगी सारा अली खान या दिवसात बरीच चर्चेत आहे. सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते त्यानंतर सिम्बा, लव आज कल या चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनात राज्य केले. वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेली सारा सध्या अनोख्या कारणामुळे चर्चेत आली आहे. ती चर्चेत असण्यामागील कारण हे तिचे येणाऱ्या चित्रपटांसाठी नसून एक वेगळेच कारण आहे. सध्या अभिनेत्री सारा अली खान तिची जुनी मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती मुळे चर्चेत आली आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या आ*त्म*ह*त्या प्रकरणात ड्र ग अँगल समोर आल्यावर एन सी बी च्या टीमने अभिनेत्री रिया चक्रवर्ती व इतर काही जणांना अ ट क केली. यानंतर या प्रकरणात बॉलीवूड मधील अजून काही २५ व्यक्तींची नावे समोर आली आहेत ज्यांचा ड्र ग्स सोबत कुठेना कुठे संबंध आला आहे. या २५ जणांच्या यादीत अभिनेत्री सारा अली खान चे नाव चकित करायला लावणारे होते. यानंतर सारा सोशल मीडियावर खूप चर्चेत आली असून सध्या तिचे व रिया चक्रवर्ती चे काही जुने फोटो खूप व्हायरल होत आहेत. या दोघींमध्ये खूप घट्ट मैत्री होती असे या फोटोंवरुन दिसून येते.
एन सी बी च्या चौकशीमध्ये रिया चक्रवर्ती ने कबूल केले की ती व सारा अली खान अनेकदा एकत्र ड्र ग्ज घ्यायच्या. दरम्यान आता सारा अली खान तिच्या मित्र परिवारासोबत गोव्यामध्ये सुट्टीचा आनंद घेत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे एन सी बी ची टीम लवकरात लवकर सारा अली खान ला चौकशीसाठी बोलावू शकते अशी माहिती समोर येत आहे. सध्या साराकडे कोणतेच काम नसल्यामुळे ती गोव्यामध्ये सुट्ट्यांची मजा घेत आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यापासून सारा तिचा येणारा नवीन चित्रपट अतरंगी ची शूटिंग सुरू करेल.
गोव्याला जाऊन सुट्ट्यांचा आनंद घेण्याची साराचीही पहिलीच वेळ नाही. परंतु तरीही सारा सारखी गोव्याला का जाते? या पाठी ड्र ग्ज हे कारण तर नाही ना असे अनेक प्रश्न समोर येत आहे. यावर सारा अली खान चे म्हणणे आहे की तिला गोव्यातील जागा, तिकडचा परिसर, तिकडचे हवामान खूप आवडते. त्यामुळे ती अनेकदा गोव्याला जाणे पसंत करते. अभिनेत्री रिया चक्रवर्ती ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी अनेकदा सारा गोव्याला गेली होती. तरीही एन सी बी च्या टीमने चौकशी केल्यावर यामागील खरे सत्य जगासमोर येईल. सध्या मागील एक आठवड्यापासून सारा गोव्यातच आहे. याबाबत साराने स्वतः तिथे अनेक फोटो शेअर केले आहेत.
मागील काही दिवसात साराने जेवढे फोटोशूट केले ते सारे गोव्यामधील होते. त्यामुळे साराला गोवा इतका का आवडतो हा प्रश्न समोर आला आहे. सारा केव्हा मित्रांसोबत नव्हे तर तिच्या कुटुंबासोबत सुद्धा गोव्याला जात असते. तिने अनेक फॅमिली फोटो सुद्धा तिचा इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत.
सारा तिचा येणारा चित्रपट कुली नंबर १ च्या चित्रीकरणासाठी पण गोव्याला गेली होती. तेथे या चित्रपटातील एक खास सीन चित्रीत करण्यात आला. साराच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिचा कुली नंबर १ हा चित्रपट प्रदर्शनास तयार आहे. मात्र लॉक डाऊन मुळे तो प्रदर्शित झाला नाही. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता वरुण धवन दिसणार असून हा चित्रपट कदाचित येणाऱ्या नवीन वर्षात प्रदर्शित होऊ शकतो. तर याव्यतिरिक्त सारा अक्षय कुमार व धनुष सोबत अतरंगी या चित्रपटाची शूटिंग करत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !