आयुष्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो. काहीजण आयुष्याकडे सकारात्मक पाहतात तर काहीजण नकारात्मक. एखादी गोष्ट ज्या दृष्टिकोनातून आपण पाहतो त्याप्रमाणे ती गोष्ट आपल्याला भावते. त्यामुळे जर एखादी गोष्ट तुम्ही नकारात्मक दृष्टीने पाहिले तर ती तुम्हाला कधीच आवडणार नाही याउलट जर तीच गोष्ट तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिली तर ती तुम्हाला लगेच आवडू लागेल.
सकारात्मक व नकारात्मक दृष्टिकोनाप्रमाणेच माणसाची निरीक्षण शक्ती सुद्धा महत्त्वाचे असते. एखाद्या गोष्टीकडे डोळसपणे पाहिले तर त्या गोष्टी तील फरक आपल्याला जाणवतो. या डोळसपणा साठी मनाची एकाग्रता असणे महत्त्वाचे असते. यासाठी मन नेहमी प्रसन्न ठेवावे. मनाची एकाग्रता वाढल्यास निरीक्षण क्षमता वाढून बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते.
यामुळे आयुष्यात आलेले कठीण प्रसंग तुम्ही सहज रित्या सोडवू शकता.सध्या सोशल मीडिया चे युग आहे. या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर अनेक चॅलेंजेस एकमेकांना देण्याचा ट्रेंड आहे. एखादा फोटो पाठवून त्यातील फरक शोधणे किंवा त्यात लपलेली एखादी गोष्ट शोधून दाखवणे या सर्व गोष्टी हल्ली विरंगुळा घालवण्याचे साधन बनले आहे.
आज आम्ही तुम्हाला असेच एक कोडे देणार आहोत. या कोड्याचे उत्तर तुम्हाला एका मिनिटाच्या आत द्यायचे आहे. या कोड्यात आम्ही तुम्हाला दोन समान दिसणारे फोटो देऊ.हे फोटो जरी समान दिसत असले तरी त्यांच्यामध्ये पाच फरक आहेत. हे फरक तुम्ही तुमच्या निरीक्षण शक्तीद्वारे ओळखून आम्हाला कमेंटमध्ये कळवायचे आहे.
या फोटोमध्ये आम्ही तुम्हाला मध्यंतरी आमिर खानचा गाजलेला चित्रपट दंगल एक फोटो दिला आहे. या फोटोमध्ये पाच वेगळे फरक आहेत ते तुम्हाला एका मिनिटात शोधून आम्हाला कमेंट द्वारे कळवायचे आहे. दमलात! खूप प्रयत्न करून देखील जर तुम्हाला या फोटोतील पाच फरक मिळत नसतील तर आम्ही तुम्हाला ते शोधण्यास मदत करतो.
फरक – १) या फोटोंमधला पहिला फरक म्हणजे पहिल्या फोटोमध्ये आमिर खान च्या गळ्यात एक टॉवेल दिसतो. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो टॉवेल गायब झाला आहे.
२) या फोटोतील दुसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोमध्ये आमिर खान च्या मागे असलेल्या मुलाने केशरी रंगाचे टी शर्ट घातलेले दिसते.तर दुस-या फोटो मध्ये त्याच मुलाने जांभळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेले दिसते.
३) या फोटोतील तिसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोमध्ये मुलांच्या मागे असलेल्या घराला दोन खिडक्या आहेत. तर या फोटो सारख्याच दिसणार्या दुसर्या फोटोत घराला तीन खिडक्या आहेत.
४) या फोटोतील चौथा फरक म्हणजे पहिल्या चित्रात आमिर खान च्या मागे असलेल्या मुलाने लाल टी शर्ट घातले आहे त्याला आर टी शर्टवर एक चित्र आहे.तर दुसऱ्या फोटोमध्ये त्या मुलाच्या लाल रंगाचा टी-शर्ट वर कोणते चित्र नाही.
५) या फोटोतील पाचवा फरक म्हणजे पहिल्या फोटोमध्ये लाल रंगाचे टी-शर्ट घालून उभ्या असलेल्या मुलाच्या मागील दरवाजा ची उंची जास्त आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्या दरवाजाची उंची कमी आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !