एम डी एच मसाल्यांचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. गुरुवारी सकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. धर्मपाल गुलाटी हे ९८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे ते आजारी होते. मात्र त्या आजारातून देखील ते पूर्णपणे बरे झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मपाल गुलाटी यांना गुरुवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे त्यांचे दुःखद निधन झाले. गेल्या वर्षी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
धर्मपाल गुलाटी यांना सर्वजण जाणतात. एम डी एच मसाल्यांच्या जाहिरातीत ते अनेकदा दिसले आहेत. धर्मपाल गुलाटी यांच्या वडिलांनी पाकिस्तानातील सियालकोट येथे १९२२ मध्ये एक छोटे दुकान उघडले होते. त्यानंतर देशाची वाटणी झाल्यावर त्यांचा परिवार दिल्लीत राहण्यास आला.
असेही म्हटले जाते की दिल्लीला आल्यावर धर्मपाल गुलाटी यांनी एक घोडागाडी विकत घेतली. ज्याद्वारे ते लोकांची किंवा मालाची ने-आण करायचे. तरीही धर्मपाल गुलाटी यांचे या कामात मन लागत नव्हते शिवाय या कामातून त्यांची हवी तशी कमाई देखील होत नव्हती.
त्यानंतर १९५३ ला चांदणी चौक मध्ये त्यांनी एक दुकान घेतले या दुकानाचे नाव त्यांनी महाशयां दी हट्टी असे ठेवले. तेव्हापासून या दुकानाला एमडीएच म्हणून ओळखले जाऊ लागले. हळूहळू धर्मपाल गुलाटी यांचे मसाले ग्राहकांमध्ये एवढे प्रसिद्ध होऊ लागले की त्यांची निर्यात संपूर्ण जगभर होऊ लागली. २०१७ मध्ये त्यांना भारतातील कोणत्याही एफ एम सी जी कंपनीतली सर्वाधिक वेतन कमावणारे सीईओ म्हणून घोषित करण्यात आले. आपल्या सीईओ पगाराच्या वाट्यातून ९०% रक्कम ते दान करत असत.
धर्मपाल गुलाटी यांची तब्बल ५४०० करोडो रुपयांची संपत्ती आहे. यात मसाल्यांच्या कंपनी, २० शाळा आणि एका हॉस्पिटलचा समावेश आहे. धर्मपाल गुलाटी यांनी दैनिक जागरण या वृत्तपत्राच्या माहितीनुसार आपल्या कुटुंबियांना तब्बल ५४०० करोड रुपये पेक्षा जास्त प्रॉपर्टी सोडून गेले !
वयाच्या ९८ व्या वर्षी सुद्धा धर्मपाल गुलाटी यांना तब्बल २१ करोड रुपये पगार मसाल्याच्या बिझनेसमधून मिळायचा. त्यामुळेच भारतीय मसाल्यांच्या बाजारात सर्वाधिक कमाई करणारा सीईओ म्हणून त्यांची ओळख होती. ते त्यांच्या शेवटच्या दिवसात सुद्धा ऑफिस आणि कारखान्यात जायचे. डीलर्स सोबत भेटीगाठी घ्यायचे.
धर्मपाल गुलाटी यांच्या बद्दल सांगायचे झाल्यास, त्यांचा जन्म २७ मार्च १९२३ मध्ये पाकिस्तानातील सियालकोट मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चुनीलाल आणि आईचे नाव चानान असे होते. धर्मपाल यांचे शिक्षण केवळ पाचवी पर्यंत झाले होते. त्यांच्या वडिलांचा मसाल्याचा बिझनेस होता मात्र धर्मपाल यांना त्याहून वेगळे काहीतरी करून दाखवायचे होते.
त्यासाठी त्यांनी सियालकोट मध्ये वेगवेगळे बिझनेस करुन पाहीले मात्र त्यांना हवे तसे यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा त्यांच्या वडिलांच्या बिजनेस मध्ये सहभाग घेतला आणि तो बिझनेस लोकप्रिय करून दाखवला. त्यांच्या बिजनेस ला देगी मिर्च वाले या नावाने संपूर्ण भारतात ओळखले जाते. देशाच्या विभागणी नंतर धर्मपाल गुलाटी दिल्लीतील करोल बाग येथे राहण्यास आले.
तेव्हापासून त्यांनी मसाल्याचे १५ कारखाने उघडले आहेत हे कारखाने १००० डीलर्सना मसाले सप्लाई करतात. एमडीएचचे दुबई आणि लंडनमध्ये देखील ऑफिस आहे. ही कंपनी साधारण १०० देशांमध्ये त्यांचे मसाले निर्यात करते. सध्या या कंपनीचा कारभार धर्मपाल गुलाटी यांचा मुलगा सांभाळतो तर त्यांच्या सहा मुली डिस्ट्रीब्यूशन चे काम सांभाळतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !