सर्वाधिक पौष्टिक पदार्थ म्हणून अंडे खाण्याचा सल्ला डॉक्टरांद्वारे दिला जातो. अंड्यामुळे शरीरीला ताकद मिळते. तसेच शरीरास आवश्यक असणारे सर्व पोषक घटक अंड्यामध्ये असतात. त्यामुळेच अंड्याला सुपरफुड असे संबोधले जाते. अंडे वेगवेगळ्या पद्धतीने सेवन केले जाते. काही वेळेस अंडे उकडुन खातात तर काहीजण त्याचे ऑम्लेट बनवुन खातात.
अंड्याची भाजी म्हणजेच बुर्जी हा अनेकांचा आवडता पदार्थ जो कमी वेळेत पटकन तयार होतो. त्यामुळे सध्याच्या धावपळीच्या युगात या झटपट होणाऱ्या पदार्थावर बरेच जण ताव मारतात. अंड्यामध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि अनेक पोषक घटक असतात. एवढे सगळे असुनही अंड्यांचे अधिक सेवन करणे आरोग्यास हानिकारक ठरु शकते.
एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर अंड्यांचे अधिक सेवन केले तर, तुम्हाला मधुमेहाचा धोका संभवतो. चीन आणि कतार येथील वैद्यकीय विद्यापीठात कलेल्या संशोधनात असे दिसुन आले की एका दिवसात एकाहून अधिक जास्त अंडी खाल्ली तर त्यामुळे मधुमेह होण्याचा धोको 60 % जास्त असतो.
दररोज 38 ग्राम अंडे खाल्यास 25% धोका वाढतो तर 50 ग्राम अंडे खाल्यास 60% धोका वाढतो. टाइप 2 डायबेटीसचा संबंध खाण्यापिण्याच्या सवयींवर असतो. डायबेटीसवर संतुलन राखायचे असेल तर खाण्यापिण्याच्या सवयींवर आळा घालावा.
डब्ल्यूएचओ चा एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जगातील जवळजवळ 6 टक्के लोक त्यांच्या वाईट जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या आजारामुळे ग्रस्त असतात. सध्या त्यांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ होत आहे. हा धोक टाळण्यासाठी अंड्या ऐवजी हिरव्या भाज्यांचे सेवन करावे.
यामध्ये पालक, कारले, ब्रोकोली, गाजर इ. भाज्या जास्त फायदेशीर ठरतात. या भाज्यांमधील अँटीऑक्सिडेंटचे गुणधर्म हृदय आणि डोळे निरोगी ठेवतात. डायबेटीस हा आजार टाळायचा असेल तर बटाटा, फुलकोबी, मका, मटार, चणा, मसूर, भोपळा, रताळे या भाज्यांचे सेवन करु नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !