प्रवास करण्यासाठी देशात वेगवेगळ्या वाहनांचा वापर केला जातो. मात्र आपण कितीही महागड्या गाड्यांमधून फिरलो तरीही ट्रेनच्या प्रवासाची मजा काही औरच असते. ट्रेनमधून प्रवास करते वेळी रस्त्यात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यास मिळतात. माणसे ट्रेनमधून प्रवास करताना आजूबाजूची झाडे झुडपे, मोठमोठ्या इमारती, बंगले डोंगर-दऱ्या, घाट, बोगदे यांसारख्या गोष्टींचा नजराणा पाहत प्रवासाचा आनंद लुटतात.
मात्र तुम्ही कधी ट्रेनच्या पटरी च्या बाजूला असलेले ॲल्युमिनियम चे बॉक्स पाहिले आहेत का? या बॉक्सचे काय काम असते? हा बॉक्स प्रवाशांच्या जीवाचे रक्षण करतो. आज आम्ही तुम्हाला रेल्वे पटरी च्या बाजूला असलेले बॉक्स प्रवाशांची सुरक्षा कसे करतात हे सांगणार आहोत.
रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या बॉक्सला एक्सेल काउंटर बॉक्स म्हणतात. ते दर ३ ते ५ किलोमीटर दरम्यान लावले जातात. या बॉक्सच्या आत एक स्टोरेज डिव्हाइस असते. जे थेट रेल्वे रुळांशी जोडलेले असतात. त्याचे कार्य रेल्वेच्या दोन चाकांना जोडणारे एक्सेल मोजणे आहे. यातून, रेल्वेची धुरा प्रत्येक 5 किलोमीटरवर मोजली जाते. या बॉक्समधून दर ५ किलोमीटर वर ट्रेनचे एक्सेल मोजले जातात.
ट्रेन स्टेशन वरून निघाल्यावर जेवढ्या चाकांनी निघते तेवढ्याच चाकांवरती पुढे देखील चालते हे या मोजणीतून कळते. रेल्वेच्या प्रवासादरम्यान जर कुठला अपघात झाला किंवा रेल्वेचे दोन डबे एकमेकांपासून वेगळे झाले तर एक्सल काऊंटर बॉक्स एक्सेलची मोजणी करून सांगतो की ट्रेन निघाली तेव्हा ती किती चाकांवर होती आणि आता चाकांची संख्या किती ने कमी झाली आहे. याशिवाय ट्रेनचे डबे कुठून वेगळे झाले हे देखील या बॉक्समधून समजते. रेल्वे अपघात घडल्यानंतर कारवाई करण्यास या बॉक्स चा उपयोग होतो.
ट्रेनच्या पटऱ्यांच्या बाजूला असलेला एक्सेल काउंटर बॉक्स ट्रेन जाताना त्याच्या एक्सेलची मोजणी करतो. या बॉक्समध्ये पाच किलोमीटरचे अंतर असते. जर एक्सेलची संख्या काउंटर बॉक्स सोबत मिळतीजुळती नसेल तर पुढील एक्सेल काउंटर बॉक्स ट्रेन ला लाल सिग्नल देतो.
जर एक्सेलची संख्या कमी झाली तर ट्रेनचा डबा त्यापासून वेगळा होतो. अशावेळी अपघातापासून वाचण्यासाठी ट्रेनला वेळीच थांबवण्याचे काम हा एक्सेल बॉक्स करतो. याव्यतिरिक्त एक्सेल बॉक्स ट्रेनची गती आणि दिशा देखील सांगतो. अशाप्रकारे हा एक्सेल बॉक्स प्रवाशांच्या जीवाचे रक्षण करण्याचे काम करतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !