बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयकौशल्य द्वारे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. हे कलाकार आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक वाटेल ती किंमत द्यायला तयार असतात. मात्र स्वतःची इमेज जपण्यासाठी हे कलाकार चित्रपटांमध्ये निवडक भूमिकाच असा करतात. इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी आजपर्यंत कधीच खलनायकी पात्र साकारलेले नाही.
या पात्रांसाठी दिग्दर्शकांनी त्यांना करोडो रुपये ऑफर केले होते मात्र तरीही या कलाकारांनी या ऑफर्स नाकारल्या. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांना खलनायकाचे पात्र साकारण्याचा आवडत नाही.
१) सनी देओल – अभिनेता सनी देओल ने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत दोन दशकांहून अधिक काम केले आहे. या काळात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट साकारले. मात्र त्यांनी कधीच व्हिलनच्या भूमिका साकारल्या नाही. १९८३ मध्ये बेताब या चित्रपटातून सनीने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. गदर, दामिनी, बॉर्डर हे काही सनी देओल चे गाजलेले चित्रपट आहेत.
२) अर्जुन कपूर – अर्जुन कपूर ने इंडस्ट्रीमध्ये काही चित्रपट केले. मात्र त्याला इंडस्ट्रीमध्ये हवे तसे यश मिळाले नाही. परंतु तरीही अर्जुनने आजतागायत कधीच खलनायकाची भूमिका साकारलेली नाही. अर्जुन ने ‘इशकजादे’ या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अर्जुन कपूर ने पानिपत या चित्रपटात सुद्धा प्रमुख भूमिका साकारली होती मात्र त्याच्यासमोर संजय दत्त निगेटिव्ह भूमिकेत असल्यामुळे या चित्रपटात अर्जुन कपूर पेक्षा संजय दत्तच जास्त भाव खाऊन गेला.
3) वरूण धवन – सध्याचा बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता वरूण धवन याने आज पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. या चित्रपटातील भूमिका त्याने उत्कृष्ट पद्धतीने साकारल्या. त्याच्या अभिनय कौशल्यामुळे त्याला काही खलनायक पात्रासाठी सुद्धा ऑफर आल्या होत्या मात्र त्याने त्या सर्व ऑफर्स नाकारल्या. वरुण धवन चा कुली नंबर १ हा चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे.
४) सलमान खान – बॉलिवूडचा मेगास्टार म्हणून ओळख असलेल्या सलमान खान मागील तीस वर्षांपासून बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये काम करत आहे. या काळात सलमान खान ने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. मात्र एवढ्या मोठ्या कार्यकाळात सलमानने एकही नकारात्मक भूमिका साकारली नाही. यशराज बॅनरचा धूम ४ या चित्रपटासाठी नकारात्मक भूमिका करायला सलमान खान ला ३०० करोड रुपयांची ऑफर आली होती. मात्र सलमान खानने ही ऑफर नाकारली.
सलमान खानने बीवी हो तो ऐसी या चित्रपटातुन बॉलिवु़डमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर १९८९ मध्ये ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात त्याला प्रमुख भुमिका साकारण्याची संधी मिळाली. यानंतर त्याची गाडी सुसाट सुटली ती आजतायागत थांबली नाही. आज देखील सलमानचा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लगेच बॉक्स ऑफिस सुपरहिट हाऊसफुलचा बोर्ड लागतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !