बॉलिवुडचा भाईजान सुपरस्टार सलमान खानचे चित्रपट पडद्यावर नेहमीच सुपरहिट होतात. सलमान खानचे वय झाले असले तरी त्याच्या जबरदस्त अॅक्शन आणि लुक्सचे चाहाते आजही कायम आहेत. सलमान खानची अनोखी स्टाइल नेहमीच प्रेक्षकांना आवडते. लाखो मुली सलमान खानवर जीव ओवाळुन टाकतात. मात्र तरीही सलमानने लग्न केलेले नाही.
सलमान खान ५५ वर्षांचा असला तरीही तो अजुन अविवाहित आहे. मात्र सलमान खानच्या आयुष्यात अशा अनेक संधी आल्या जेव्हा सलमान खानने लग्न करण्याचा विचार केला होता. खुप वर्षांपुर्वी सलमान खानला एक मुलगी आवडायची पण तो तिला त्याच्या मनातली गोष्ट सांगु शकला नाही.
बिग बॉस 13 च्या शोवर अजय देवगण आणि काजोल गेले होते. सलमान खानच्या या शो मध्ये जो कोणी सेलिब्रेटी येतो तो सलमान खान सोबत नेहमीच मस्ती करतो. अशाच एका गेम मध्ये सलमानने सांगितले कि लहानपणी सलमानचे एका मुलीवर प्रेम होते. जर त्या मुलीशी त्यांचे लग्न झाले असते तर आता पर्यत सलमान आजोबा झाले असते.
सलमानने शो मध्ये सांगितले कि, तो ज्या मुलीवर प्रेम करायचा त्या मुलीच्या कुत्र्याने सलमानला चावले होते. मात्र सलमानच्या मनात ती मुलगी आपली कशी होईल हेच विचार चालु असायचे. सलमानने सांगितले कि त्याने नकाराच्या भीतीने तिला त्याच्या मनातली गोष्ट कधीच नाही सांगितली. एवढेच नाही तर त्या मुलीचे अफेयर सलमानच्या तीन मित्रांसोबत होते. त्या मुलीलाही ते आवडायचे.
त्यानंतर सलमानने हसत सांगितले की 15 – 20 वर्षांनी जेव्हा ती मुलगी मला पुन्हा भेटली तेव्हा ती आजी बनली होती. तिने मला सांगितले कि ही माझी नातवंड आहेत आणि ते तुझे फॅन आहेत. तुझे चित्रपट त्यांना आवडतात. तेव्हा सलमानने म्हटले बरे झाले मी हिच्याशी लग्न केले नाही, नाहीतर मी ही आतापर्यंत आजोबा झालो असतो.
सलमानच्या आयुष्यात अनेक मुली आल्या. मात्र त्यापैकी कोणत्याच अभिनेत्रीचे प्रेम सलमानला लग्नापर्यंत नेऊ शकले नाही. असे म्हटले जाते कि संगीता बिजलानी सोबत सलमानच्या लग्नाच्या पत्रिका सुद्धा छापल्या गेल्या होत्या. मात्र कोणत्यातरी कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकले नाही.
या व्यतिरिक्त सलमानचे नाव ऐश्वर्यासोबतसुद्धा जोडले गेले होते. मात्र त्यांचे नाते भंयकर पद्धतीने संपले. त्यानंतर त्याचे नाव कॅटरिना कॅफ आणि लुलिया वंतुर सोबत सुद्धा जोडले गेले. मात्र तरीही सलमानने कोणाशीच लग्न केले नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !