लग्न म्हणजे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. समजूतदारपणाने लग्नासंबंधीचे सर्व निर्णय घेतले जातात. जोडीदाराची योग्य निवड करत आपल्या जीवनात जे काही चढ उतार येऊन गेलेत ते त्या व्यक्तीला सांगत पुढील वाटचालीविषयी माहिती घेत आपण निर्णय घेतो.
लग्न हे एक अनोखे बंधन आहे, जर हे बंधन योग्य पद्धतीने बांधले गेले तर आयुष्यात सुखाची कमी कधीच जाणवत नाही आणि जर काही कारणास्तव हे बंधन विस्कटले तर आयुष्यात दुःखच दुःख असते. आपल्या देशात अजूनही मोठ्या प्रमाणात लग्न हि अरेंज मॅरेज केली जातात. फार कमी प्रमाणात प्रेम विवाहाला मान्यता दिली जाते. त्यामुळे कुटुंबाच्या संमतीने लग्न ठरवले जाते.
त्यामुळे अरेंज मॅरेज साठी आपल्या पार्टनरला आपण जेव्हा भेटतो, तेव्हा पूर्णपणे आपल्याला त्या व्यक्तीला समजून घेणं शक्य होत नाही. काही वेळेस कुटुंबांकडून एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ दिला जातो. पण काही वेळेस फार घाईत लग्न ठरवली जातात. त्यामुळे पहिल्या भेटीत काही साधारण प्रश्न विचारून आपण आपल्या होणाऱ्या पार्टनरबद्दल निर्णय घेऊ शकतो. प्रेम विवाह करताना देखील हे प्रश्न विचारणं तितकंच गरजेचं असतं. तर मग पाहूया कोणते आहेत हे प्रश्न….
1. लग्नासाठी कोणत्या प्रकारे द*बा*व टाकला जातो आहे का? – द*बा*वाखाली लग्न केले, असे आपण ऐकतो. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव लग्नासाठी कुटुंबियांकडून लग्नासाठी द*बा*व टाकला जातो. काही वेळेस अटी दिल्या जातात व त्या अटी पूर्ण होण्यासाठी द*बा*व टाकला जातो. फक्त मुलींवर नाही तर मुलांवर देखील लग्नासाठी द*बा*व आणला जातो.
अशा परिस्थितीत जेव्हा आपण लग्नाच्या संदर्भात एखाद्याला भेटतो तेव्हा प्रथम हे जाणून घ्या की पालकांच्या द*बा*वात ते लग्न करीत नाहीत. बर्याच वेळा लोक दडपणाखाली लग्न करतात पण नंतर आयुष्यात फक्त दुःख राहते. अशा परिस्थितीत लग्नाचा द*बा*व त्यांच्यावर आहे की नाही हे स्पष्टपणे विचारा.
2. करियर संबंधी भविष्यतील योजना काय आहेत? – आपण कसे ही राहून मार्ग काढत स्वतःचे पालन पोषण करू शकतो, स्वतःच्या गरज पूर्ण करू शकतो, पण जेव्हा आपल्यावर एखाद्या व्यक्तीची जबाबदारी येते तेव्हा ते नक्कीच अवघड होऊन बसतं. आपण आपल्या करियरच्या वाटेल लागलो की आपल्या लग्नाचे वय होते आणि मग लग्नासाठी घरून विचारणा केली जाते.
त्यामुळे आपल्या होणाऱ्या पार्टनरच्या करियर विषयी काय योजना आहेत हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. या प्रश्नामुळे आपल्याला एक अंदाज येतो कि आपला पार्टनर त्याच्या करियरमध्ये सेटल आहे कि अजून इतर टप्पे त्याला त्याच्या आयुष्यात पार पाडायचे आहेत.
3. कुटुंबा विषयीची माहिती – बऱ्याच अरेंज मॅरेजमध्ये मुलं मुलीला फार जास्त वेळेस भेटणे शक्य होत नाही. ते दोघे एकमेकांना पसंत पडले की लगेच त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे आपण त्या व्यक्तीला तर थोडे फार ओळखू लागतो. पण त्याच्या कुटुंबाविषयी आपल्याला जास्त माहिती करून घेता येत नाही. कुटुंब संकल्पनेबद्दल आपल्या पार्टनरचे काय विचार आहेत हे जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला निर्णय घेण्यास सोपं पडतं आणि यापुढे या गोष्टींबद्दल दोघांमध्ये भांडण देखील होणार नाही.
4. मुलीचे कुटुंब ही तितकेच गरजेचे आहे – लग्न झालं की मुली स्वतःच घर सोडून सासरी जातात. पण अनेकदा असं म्हटलं जातं की मुली या सासर हे स्वतःचं घर समजत नाहीत. पण इतरांपेक्षा कोणीही नवऱ्याने समजून घेतलं पाहिजे की लग्नानंतर मुलीवर दोन घरांची जबाबदारी असते, त्यामुळे जितकी मुलीची तिच्या सासरीप्रती व माहेराप्रती जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे मुलाची देखील त्याच्या घराप्रती व मुलीच्या माहेराप्रती जबाबदारी असते. त्याने दखल दोन्हीकडच्या गोष्टी सारख्याच सांभाळल्या पाहिजेत.
5. मुलीने काम केल्याने काही कोणतीही अडचण तर नाही – लग्नासाठी प्रत्येकाला सुशिक्षित आणि मॉडर्न पार्टनर हवी आहे पण लग्नानंतर तिने काम केलेले मात्र त्यांना सहन होत नाही. आपण जर वर्किंग वुमन असाल आणि आपले काम पुढे असेच चालू ठेवत इच्छित असाल तर ही गोष्ट आपल्या पार्टनर सोबत आधीच ही गोष्ट सविस्तरपणे बोलून घ्या. नाहीतर पुढे जाऊन आपल्या करियरमुळे व कामामुळे आपल्या वैवाहिक जीवनात काही मतभेद उदभवू शकतात. या प्रश्नाच्या उत्तरामुळे आपल्याला कळेल की तुमचा होणार पार्टनर तुमच्यासाठी किती योग्य आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !