लग्नानंतर मुली दागदागिने घालुन मिरवतात. लग्नानंतर करायच्या शृंगारात एक वेगळीच मजा आणि साज असतो. यामध्ये पैजण आणि जोडव्यांना विशेष महत्व असते. पण तुम्हाला माहित आहे का की लग्नानंतर घातल्या जाणाऱ्या दागिन्यांमध्ये पारंपारिकासोबत वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. लग्नानंतर एका मुलीची वैवाहिक स्त्री म्हणुन जबाबदारी वाढते.
मुलीवर तिचे सासर सांभाळण्याची आणि घराचा वंश वाढवण्याची जबाबदारी असते. या सर्व गोष्टीत तिला कोणती अडचण येऊ नये तसेच अडचणींचा सामना करण्यासाठी तिला बळ मिळावे यासाठी वेगवेगळे दागिने घालण्याची परंपरा आहे. त्यामुळे प्रत्येक दागिन्यांपाठी एक वैज्ञानिक महत्व असते.
१) पैजण नकारात्कतेपासुन वाचवते – लग्नानंतर घातल्या जाणाऱ्या दागिन्यांमध्ये पैजणीला विशेष महत्व असते. परंपरेनुसार सुवासिनीने पैजण आजन्म घालावी. दुसर एक वैज्ञानिक कारण म्हणजे तिची पॉजिटीव्ह एनर्जी. पैजणींमधल्या घुंगरामधुन निघणाऱ्या आवाजाला क्रिया शक्ती असे म्हणतात. असे म्हणतात कि जेव्हा त्या घुंगरांचा आवाज वातावरणात मिसळतो तेव्हा ती पैजण घालणारी व्यक्ती आजुबाजुच्या निगेटीव्ह एनर्जीपासुन वाचते. याशिवाय पैजण स्त्रीचे सुरक्षा कवच म्हणुन सुद्धा मदत करते व तिला वाईट नजरेपासुन वाचवते.
२) पैजण हाडांना मजबुत बनवते – पैजण घालण्यापाठी आणखी एक वैज्ञानिक कारण म्हणजे त्यामुळे हाडं मजबुत होते. जेव्हा पैजण पायांना घासली जाते तेव्हा त्वचेच्या माध्यमातुन हाडांना त्यांचा फायदा होतो. याशिवाय असेही म्हटले जाते कि विवाहितेच्या पायांना जर सुज येत असेल तर त्यांनी पैजण घातल्यास ती सुज कमी होते.
३) पैजणीसंबधी आध्यात्मिक मान्यता – चांदी शरीर थंड ठेवते. त्यामुळेच चांदीची पैजण घातली जाते. कारण त्यामुळे तापमान शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते. यामागे आध्यात्मिक कारण सुद्धा आहे कि जी महिला सतत आजारी असते त्या महिलेची तब्येत पैजण घातल्यामुळे सुधारते.
४) वास्तुशास्त्रात सुद्धा पैजण घालण्याचे आहे महत्व – वास्तुशास्त्राच्यामते पैजणीला असलेले घुंगरु नकारात्क शक्तीपासुन वाचवतात. याव्यतिरिक्त त्याला दैविक शक्तीसुद्धा प्राप्त असते असे ही म्हणतात. जी महिलांना वाईट नजरेपासुन वाचवते.
५) जोडीदारासाठी असते फायदेशीर – पैजण घालुन जेव्हा तुम्ही तुमच्या रुममध्ये जाता तेव्हा त्या पैजणींमधल्या घुंगरांचा आवाज ऐकुन तुमचा पार्टनर सर्तक होईल. त्या पैजणींच्या आवाजामुळे अचानक घडणाऱ्या घटनांपासुन तो स्वत:ला वाचवु शकेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.