तुम्हाला जाणुन आश्चर्य वाटेल पण एखाद्या माणसाच्या नखांच्या आकारावरुन त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व आणि चरित्र ओळखु शकता. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाच्या नखांच्या आकाराबद्दल सांगणार आहोत. ज्यावरुन तुम्ही काही लोकांची रहस्ये ओळखु शकता. आपल्या नखांमध्ये अनेक रहस्ये दडलेली असतात. लांब, छोटे, गोल, वर्गकार अशा वेगवेगळ्या प्रकारची नखे असतात. जे आपल्या व्यक्तीमत्वाबद्दल सांगतात. नखांचा आकारावरुन या विशेष गोष्टी सांगितल्या आहेत.
लांब नखे – लांब आणि आयताकार नखांचा अर्थ असतो कि तुम्ही बुद्धीमान आहात. तुम्हाला हसत खेळत आयुष्य जगायला आवडतं. तसेच तु्म्ही गुपित जपुन ठेवता. तुम्हाला नवीन व्यक्तींना भेटायला. नवीन गोष्टी शिकायला खुप आवडतं. या व्यक्ती नव्या गोष्टींचा अनुभव घेण्यास नेहमीच उत्सुक असतात. कामाच्या प्रति तुम्ही एक सतर्क आणि विचारशील व्यक्ती आहात. कोणतेही काम करताना तुम्ही त्याचा दोन वेळा विचार करता. कामात नेहमीच सावधगिरी बाळगता. एखादे काम चांगल्या पद्धतीने करायचे असेल तर तुम्ही कोणतीही कसर मागे सोडत नाही.
पसरट नखे – तुमची नखे पसरट आहे तर तुम्ही हुशार आणि चौकस व्यक्ती आहात. बोलण्याआधी तुम्ही नेहमी तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतात. तुम्ही खुप चारित्रवान आहात. तुमच्या विचारसरणीमुळे तुमचे मित्रमंडळी नेहमीच तुमचा सल्ला घेत असतात. काम चालवुन नेणाऱ्या गोष्टींपेक्षा ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या करायला तुम्हाला आवडतात. एखादे लक्ष्य साध्य करण्यासाठी तुम्ही भरपुर मेहनत घेता.
छोटे आणि गोल नखे – तुम्ही एक रचनात्नक व्यक्तिमत्व आहात. तुम्ही मजबुत आणि दृढ होण्यासोबतच मजेशीर आणि उत्साहपुर्ण व्यक्तीसुद्धा आहात. तुमच्याकडे एकप्रकारचे आकर्षण आहे जे लोकांना तुमच्याकडे खेचुन घेत असते. तुमच्या प्रिय व्यक्तींपाठी कोणत्याही परिस्थित उभे राहतात. तुमच्या साहसाने वेगवेगळ्या परिस्थित शक्तीप्रदर्शन करु शकता. काही वेळेस तुम्ही खुप हट्टीसुद्धा होता.
आयताकार नखे – तुम्ही एक संघटीत, व्यवस्थित असे व्यक्तीमत्व आहात. तुमचा दुर दृष्टीकोन खुप चांगला आहे. तुमच्यामध्ये एक नेतृत्व प्रवृत्ती आहे. कोणतीही जबाबदारी घेण्यास तुम्ही कचरत नाही. लोकांचा तुमच्यावर विश्वास असल्यामुळे ते तुमच्याकडे महत्वाच्या कामांमध्ये मदत घेत असतात. तुम्ही तुमची कामे भरपुर सावधानीपुर्वक करतात. तुम्हाला इतरांसोबत मजेत आणि प्रेमाने राहायला आवडते.
त्रिकोणी नखे – त्रिकोणी आकारांची नखे असलेली व्यक्ती फार कमी पाहण्यास मिळतात. या व्यक्तींना पुढे ते काय करतील हे जाणुन घेण्याची खुप उत्सुकता असते. या लोकांचे लक्ष्य स्पष्ट नसते. काही वेळेस असे लोक त्यांचे उद्दीष्ट प्राप्त करण्यासाठी खुप भावुक किंवा जिद्दी होतात. हे व्यक्ती “वर्क स्मार्ट, नॉट हार्ड” सिद्धांतीवर काम करतात. एखादे काम सुरु करण्यापुर्वी ते करण्यात आपण आपली मेहनत व वेळ तर वाया घालवत नाही ना या गोष्टींचा ते सतत विचार करत असतात.
लंबगोलाकार नखे – अशी नखे असलेल्या व्यक्ती रचनात्मक , जेंटल आणि प्रेमळ असतात. हे लोक त्यांच्या सभोवताली असलेल्या सुंदर गोष्टींप्रति खुप संवेदनशील असतात. असे लोक प्रतिकुल परिस्थितीत खुप शांत राहतात. त्यांच्या अशा स्वभावामुळेच इतर लोक त्यांच्याकडे आकार्षित होत असतात. कोणाचाही राग शांत करण्याची यांच्याकडे खास कला असते. हे लोक अनेक कामे एकत्र करणे पसंत करतात. ती कामे करताना ते खुप मन लावुन आणि मेहनतीने करतात. अशा व्यक्ती स्वत:ला खुप व्यस्त ठेवणे पसंत करतात. या व्यक्ती सगळ्यांवर मनापासुन प्रेम करतात.
असमान नखे – अशी नखे असलेल्या व्यक्ती कपडे, संगीत, खाणे यांसारख्या गोष्टी करणे पसंत करतात. त्यांना कोणत्याही गोष्टी त्यांच्या पद्धतीने करायला आवडतात. अशा लोकांसाठी अथक परिश्रम हाच जीवनाचा खरा अर्थ आहे. असे लोक जीवनाची मजा घेता घेताच इतर कामे सुद्धा मन लावुन करत असतात. या व्यक्ती नेहमी खुश आणि व्यस्त राहण्याकडे कल देतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !