बॉलिवुडची सौंदर्यवती आणि धकधक गर्ल माधुरी दिक्षित नुकतीच ५४ वर्षांची झाली. माधुरीचा जन्म १५ मे १९६७ मध्ये झाला. माधुरीने अबोध चित्रपटातुन बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. एकीकडे माधुरी दिक्षितचे नाव सर्वत्र गाजत होते. चित्रपटांमुळे ती घराघरात पोहचली होती. तर दुसरीकडे तीचे संजय दत्त सोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत आली होती.
संजय दत्तने सुद्धा ही गोष्ट एकदा कबुल केली होती की त्याला माधुरी दिक्षितसोबत लग्न करण्याची इच्छा होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच असल्यामुळे पुढे जावुन दोघांच्या ही वाटा वेगवेगळ्या झाल्या.
जेव्हा संजय दत्तचा संजु हा सिनेमा प्रदर्शित झाला होता त्यावेळी त्यात माधुरीचा ही काही सीन असेल असे अनेकांना वाटले होते. मात्र नंतर असे समजले की स्वता माधुरीनेच त्या चित्रपटातला तिच्याशी संबंधीत सीन कापयला सांगितला होता. कारण माधुरीच्या वर्तमानात तिच्या भुतकाळाची छाया पडु नये अशी तिची इच्छा होती.
सुरुवातीला संजु चित्रपटात माधुरी आणि संजय दत्तच्या अफेअर संबधीत सीन होता. मात्र नंतर ते सीन डिलीट करण्यात आले. सध्या माधुरी तिच्या आयुष्यात खुप खुष आहे. त्यामुळे तिच्या भुतकाळातील गोष्टी पुन्हा जगासमोर येऊ नये याची ती पुरेपुर काळजी घेत आहे. काही रिपोर्टस् नुसार संजु चित्रपटाच्या एका सीनमध्ये संजय दत्तला अटक झाल्या नंतर ते एका अभिनेत्रीला फोन करतात. परंतु तो फोन त्या अभिनेत्री ऐवजी तिची आई उचलते. त्यावेळी समोरुन उत्तर येते की ती आता तुझ्याशी कोणतेच नाते ठेवु इच्छित नाही. ती अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसुन चक्क माधुरी दिक्षित बद्दलचा तो सीन होता.
ही गोष्ट १९९३ मधील असुन तेव्हा मुंबईत झालेल्या स्फो*टा*संबधी संजय दत्तला अटक करण्यात आली होती. त्यावेळी अटक करण्यापुर्वी पोलिसांनी त्याला एक फोन करण्याची परवानगी दिली होती. असे म्हटले जाते की संजयने तो फोन माधुरी दिक्षितला केला होता. संजय दत्त त्यावेळी १६ महिने तुरुंगात होता. त्यावेळी माधुरी दिक्षित त्याला तुरुंगात सुद्धा भेटायला गेली नव्हती किंवा तो घरी आल्यावर सुद्धा ती भेटायला आली नाही. तिथेच त्या दोघांचे नाते संपले. त्या घटनेनंतर माधुरीला संजयला बद्दल अनेक प्रश्न करण्यात आले होते. मात्र तिने कोणत्याच प्रश्नांना उत्तर दिले नाही. त्यानंतर माधुरीने १९९९ मध्ये अमेरिकेतील कार्डियो सर्जन श्रीराम नेनेसोबत लग्न केले.
माधुरीने अबोध चित्रपटातुन अभिनयाला सुरुवात केल्यानंतर बाप (1985), स्वाति (1986), उत्तर दक्षिण (1987) , दयावान (1988) ,ते*ज़ा*ब, राम लखन (1989), त्रिदेव (1989), और किशन कन्हैया (1990) यांसारख्या चित्रपटांमधुन नाव कमवले. १९९० मधील दिल चित्रपटामध्ये काम केल्यानंतर तिला फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले. १९९२ मध्ये बेटा चित्रपटासाठी तिला दुसऱ्यांदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. एक्शन थ्रिलर खलनायक (1993) ,अंजाम (1994) , हम आपके हैं कौन (1994) , 1997 मध्ये रोमांटिक फिल्म दिल तो पागल है केला त्यासाठी तिला पुन्हा एकदा फिल्मफेअरने गौरवण्यात आले. त्यानंतर माधुरीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले व डान्स रियालिटी शो झलक दिखला जा चे ४ सीझन जज म्हणुन काम केले. माधुरी सर्वात शेवटी कलंक मध्ये दिसली होती.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !