साऊथमधील चित्रपट म्हणजे पॉवरपॅक एंटरटेनमेंट. तामिळ, तेलुगू, कन्नड अशा विविध भाषांमधून हे चित्रपट प्रदर्शित होतात. अफलातून पटकथा, रोमांचक फायटिंग सीन, जबरदस्त कलाकार आणि त्यांचा अभिनय या जोरावर हे चित्रपट हिट ठरतात. इतकंच नव्हे तर या चित्रपटांचं हिंदी भाषेत डबिंग केलं जातं आणि दक्षिणेकडील भाषा न येणारे लोक हे डबिंग चित्रपट पाहून मनोरंजन करतात. काही अशी गाणी देखील आहेत जी दक्षिणेकडील भाषेत असून देखील त्या गाण्याला दिलेल्या संगीताच्या जोरावर हि गाणी त्याच भाषेत मोठ्या प्रमाणावर ऐकली जातात.
दक्षिणेकडील सर्वच कलाकार हे त्यांच्या स्टाईलमुळे प्रसिद्ध आहेत. वेगवगेळ्या कथा लीलया पेलत त्यातून उत्तम चित्रपट तयार करत लोकांचं मनोरंजन करणे हा, प्रत्येक चित्रपट तयार करण्याचा हेतू असतो. चित्रपटाचे वेगवेगळे जॉनर असतात, तर त्यापैकी थ्रिलर म्हणजेच रोमांचक कथा असलेले टॉप ५ चित्रपट पाहणार आहोत.
१. अथिरता – २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट कन्नड भाषेतील असून ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे कथानक एका इंजिनियर मुलाभोवती फिरते. तो मुलगा इंजिनियरिंग सोडून पीव्हीमधी पत्रकार म्हणून नोकरीला लागतो. त्यानंतर तो एका बँकेच्या घोटाळ्यामध्ये देखील अडकतो आणि मग तो स्वतःला या घोटाळ्यामध्ये स्वतःला सिद्ध करतो, अशी हि संपूर्ण या चित्रपटाची कथा आहे. चेतन कुमार आणि लता हेगडे हे कलाकार मुख्य भूमिकेत असून तर कबीर दुहान सिंग आणि साधू कोकिळा हे सहाय्यक कलाकार आहेत. सोबतच या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध साऊथ स्टार महेश बाबू याने केलं आहे.
२. कौन है व्हिलन – २०१७ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट मल्याळम भाषेतील या चित्रपटातची गूढकथा असून हा एक थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट मर्डरवर आधारित आहे, या चित्रपटाच्या सुरुवातीलाच तीन मर्डर हे एकाच पद्धतीने झालेले दाखवले आहेत. या चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणात क्राईम सीन्स दाखवले असून हा चित्रपट एका सिरीयल किलर वर आधारित आहे. या चित्रपटामध्ये मोहनलाल, विशाल, मंजू वॉरीयर, हंसिका मोटवानी , राशी खन्ना आणि श्रीकांत असे कलाकार असून बी. उन्नीकृष्णन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. कौन है व्हिलन हा भारतातील असा एकमेव चित्रपट आहे जो ८ के रिसोल्युशनमध्ये चित्रित झालेला आहे.
३. लास्ट बस – २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला लास्ट बस हा चित्रपट कन्नड भाषेतील असून तो सायकोलॉजिकल थ्रिलर आणि भयपट आहे. या चित्रपटामध्ये ६ जण एका बसमधून प्रवासासाठी निघतात व या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत बरेच किस्से घडतात असे दाखवण्यात आले आहे. बोलण्यास जितकं सहज वाटणारी ही कथा चित्तथरारक आहे. एस. डी. अरविंद यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून अविनाश नरसिम्हाराजू, मेघश्री भगवतार, मानसा जोशी हे कलाकार या चित्रपटात आहेत. लास्ट बस हे एकमेव चित्रपट आहे ज्याचं फ्रेंच भाषेत डबिंग झालं आहे.
४. रतसासन – २०१८ मध्ये तामिळ भाषेतील सायकोलॉजिकल क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. साऊथमधील सर्वात टॉपचा मानला जाणारा हा थ्रिलर चित्रपट आहे. राम कुमार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत. विष्णू व अमला हे दोन कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. विष्णूची भूमिका ही आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर तो पोलीस होतो व सिरीयल किलरला पकडण्यासाठी त्याचा कायम मागुवा घेत असतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. रातसासन या चित्रपटाचा २०१९ मध्ये रिमेक केला गेला. बेल्लमकोंडा श्रीनिवास व अनुपम परमेश्वरानं हे दोघे मुख्य भूमिकेत असून रमेश वर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला, रिमेक केलेल्या या चित्रपटाचे नाव नाव ‘रक्षासुडू’ असे ठेवले गेले. हिंदीमध्ये डबिंग केल्यावर ‘में हू दंडाधिकारी’ या नावाने हा चित्रपट रिलीज झाला.
५. कवलुदारी – २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट एक निओ-नोअर थ्रिलर चित्रपट असून तो कन्नड भाषेत रिलीज झालेला आहे. या चित्रपटाची कथा ही ट्रॅफिक कॉन्स्टेबल श्यामची आहे. त्याला एक ठिकाणी तीन सांगाडे सापडतात आणि या सांगाड्यांचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न तो करतो असा चित्रपट आहे. हा चित्रपट हेमंत राव यांनी दिग्दर्शित देखील केला आहे व या चित्रपटाची कथा देखील लिहिली आहे. ऋषी, अनंत नाग, अच्युत कुमार, सुमन रंगनाथन आणि रोशनी प्रकाश हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये या चित्रपटटामध्ये दाखवले आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !