मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋजुता देशमुख. लहानपणापासूनच तिने अभिनयास सुरुवात केली. चौथीमध्ये असताना तिने एका नाटकात काम केले आणि त्या नाटकांचे तब्बल ५०० शो तिने केले त्यांनतर महाविद्यालयामध्ये असताना “अभिनेत्री” या नाटकामध्ये तिने काम केले.

स्टार प्रवाहावरील प्रसिद्ध मालिका “राजा शिवछत्रपती” या मालिकेतील सईबाई राणीसाहेबांची तिची भूमिका फारच गाजली. झी मराठीवरील “कळत नकळत” या प्रसिद्ध मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. कहानी घर घर की, सावर रे, आभाळमाया, गोष्ट एक नंदीची अशा मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

बऱ्याच काळानंतर आता ऋजुताने पुन्हा टीव्ही विश्वात पदार्पण केलं आहे. स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांच्या पसंतीची मालिका “रंग माझा वेगळा” या मालिकेतून तिने पुन्हा टीव्ही विश्वात बऱ्याच काळानंतर कमबॅक केले. या मालिकेतील दीपाच्या मदतीस आलेल्या श्री व सौ आठवले जोडप्यातील सुधा आठवले यांची भूमिका ती साकारत आहे आणि विशेष बाब म्हणजे श्री आठवले हे तिचे खऱ्या आयुष्यातील पती शिरीष जोशी आहेत.

तिच्या अभिनय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा ती तिच्या पतीसोबत अभिनय करत आहे. याबद्दलची एक पोस्ट देखील तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेयर केली आहे. या पोस्टमधून तिने रंग माझा वेगळाच्या टीमचे आभार देखील मानले आहेत.
या पोस्टमधूनच तिने आपण आपल्या पतीसोबत काम करत असल्याचे तिने चाहत्यांना सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rujuta Deshmukh (@rujutadeshmukhofficial)


तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “Worked with Reel and Real Husband (Shirish Joshi) for the first time ever….Never thought of this casting. ‘एकत्र काम करायचं नाही’, हे तत्व पाळण्याचा प्रयत्न केला, बरीच वर्षं……पहिल्यांदा अभिनय केला एकत्र आणि मज्जा आली. @rangmazaveglaofficial Thanku @aparna.ketkar.1 @atulketkar for imagining this….and thanks @star_pravah @rajwadesatish @monicaranadive @shamasikander for approving this pair….
रंग माझा वेगळा ही मालिका आता पुढे काय वळण घेणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *