स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ ह्या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेते किरण माने विलास पाटील हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत आणि त्यामुळे या मालिकेला चर्चेचं उधाण आलं आहे. किरण माने हे अनेकदा त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात. त्यांच्या या लिखाणाला एक ग्रामीण स्पर्श असतो. अनेकदा ते राजकीय घडामोडींवर ते भूमिका मांडताना दिसतात.
अशाच एक राजकीय वक्तव्य केल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांनी घेतलेल्या या राजकीय भूमिकेमुळे ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून त्यांना काढून टाकले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चर्चेचा विषय ठरतोय. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर टीकास्त्र देखील चालवली जात आहेत.
किरण माने यांच्यावर राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत त्यांना मालिकेतून बाहेरचा रास्ता दाखवला असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर अनेक कलाकारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. परंतु, त्यांना मालिकेबाहेर काढण्याचे कारण त्यांच्या सहकलाकारांनी सांगितले आहे. महिला कलाकारांसोबत गैरवर्तणूक, वेळोवेळी सांगूनही शि’स्त’भं’ग करणे या कारणांमुळे त्यांना मालिकेकडून लाल कंदील दाखवण्यात आला आहे. याबद्दल त्यांच्या सहकालाकरांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मालिकेतील शर्वानी पिल्लई म्हणजेच त्यांच्या पत्नीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रींनी म्हटले आहे की, किरण ह्यांनी पसरवलेली बातमी खोटी असून त्यांना मुळात गैरवर्तणुकीमुळे शो मधून काढण्यात आले आहे आणि त्यांना पूर्वकल्पना दिलेली होती, अनेकदा त्यांना स्वभाव सुधारा असं बजावण्यात ही आलं होतं. तीन वेळा सांगून मग चौथ्या वेळी प्रोडक्शन हाऊसने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. किरण माने ह्यांनी केलेले आरोप हे मुळात चुकीचे आहेत आणि राजकीय टिप्पणी केली म्हणून काढलं, ह्याच्याशी काहीही संबंध नाही.
मालिकेतील साजिरी म्हणजेच दिव्या सुभाष या अभिनेत्रींना प्रतिकीर्या देत म्हटले आहे कि, किरणसोबत अलीकडे बोलणं होत नसे, मला ते वजनावरून टोमणे मारत असत व स्वतःला हिरोईन समजू नकोस, माझ्यामुळे शो चालतोय, असं ते म्हणायचे, जेव्हा मुळात चॅनेलने मला हिरोईन म्हणून कास्ट केलंय, तर त्यात समजायचं काय आहे. स्टार प्रवाहच्या इव्हेंट्समध्ये महत्त्व शौनक – साजिरीला मिळत असल्याने त्यांना कुठेतरी खटकतं होतं आणि असुरक्षित वाटतं होतं. त्यांचे टोमणे सतत जिव्हारी लागायचे आणि त्यांना ह्याबद्दल वारंवार चेतावणी देखील देण्यात आली होती.
ज्येष्ठ अभिनेत्री सविता ताई म्हणाल्या, किरण सतत सेटवर टोमणे मारायचे, त्यांना आपणच ह्या मालिकेचे हिरो आहोत असं वाटायचं आणि शौनक – साजिरीमुळे नव्हे तर आपल्यामुळए ही मालिका चालत आहे, असे त्यांचे म्हणणे होते. गुळूंब गावच्या ग्रामस्थांनी शूटिंग बंद करा म्हणून सांगितलं होतं पण आमची सत्याची बाजू ऐकून झाल्यावर, त्यांनी तो निर्णय माघारी घेतला आणि आमचं शूटिंग म्हणून एक मिनिट देखील थांबलं नाही आहे. तर वरील संपूर्ण प्रकाराचे खुद्द स्टार प्रवाह वाहिनीने एक जाहीर निवेदन देखील दिले आहे.
स्टार प्रवाहचे निवेदन – “मुलगी झाली हो’ या शोमध्ये विलास पाटील यांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक असल्याचे आम्हाला समजले आहे. त्यामुळे अशाप्रकारचे आरोप करणे दुर्देवी आहे.” “या मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, माने यांना शोमधून काढून टाकण्याचा निर्णय त्यांनी अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला नायिकेसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे घेतला होता. अनेक सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांचा ते अनादर करायचे. या आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.”
“या तक्रारीनंतर किरण माने यांना अनेकदा समज देण्यात आली होती. पण, माने यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्यांच्या या वागणुकीमुळे सेटवरील शिस्त आणि वातावरण बिघडू लागलं. त्यासोबत सहकलाकारांना, त्यातही महिलांना अवमानकारक वर्तणूक मिळत असल्याने त्यांना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.”
“आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संपूर्ण आदर करतो. पण त्यासोबतच आमच्या कलाकारांना, विशेषतः महिलांना एक सुरक्षित कार्यक्षेत्र देण्यास कटिबद्ध आहोत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे,” असे जाहीर स्पष्टीकरण स्टार प्रवाह वाहिनीतर्फे देण्यात आले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !