मोगऱ्या सारखीच दिसणारी जाईची फुले सर्वांनाच माहिती असतील त्याचा मोहक सुगंध मनाला भुरळ घालणारा आहे. दिसायला छोटी असणारी हे फुल आणि त्यांची पान आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहेत.
१) तोंड येण्यावरगुणकारक : जिभेला तांबडे, पांढरे चट्टे पढून तोंड येते, जिभेला तिखट गरम लागू देत नाही, खूप वेदना होतात , अशा वेळी जाईच्या फुलांचा रस दररोज थंड पाण्यातून सकाळी व रात्री २-२ चमचे या प्रमानात ७ दिवस घ्यावा. वरचेवर तोंड येत असेल तर जाईची फुले, दारू हळद व त्रिफळा यांचा सम प्रमाणात एकत्रित करून काढा तयार आणि या काढ्याने वरचेवर गुळण्या कराव्यात या उपायामुळे वरचेवर तोंड येणे हि तक्रार नाहीशी होते.
२) तळपायाच्या भेगांवर गुणकारक : तळपायांना भेगा पडून त्रास होतो. क्वचित त्या ठिकाणी जखमाही होतात. पाणी लागले तर टाचा व तळपायाची भयंकर आग होते. अशा तक्रारी टाचा तळपाय स्वच्छ धुऊन त्यावर जाईच्या तेलाचे मालिश करावे यामुळे पाय मऊ पडतात व तळपायाच्या भेगा , जखमा भरून: येतात.
३) डोळ्याच्या तक्रारींवर गुणकारक : डोळ्याची आग होणे, डोळे कचकचने, डोळ्यातून पाणी वाहने डोळे लालबुंद होणे या तक्रारी जाईची फुले पाण्यात उकळून त्यात थोडीशी तुरटी फिरवावी व त्या पाण्याचे थेंब दोन्ही डोळयांत सकाळ संध्याकाळ घालावेत.
४) स्त्रियांच्या तक्रारींवर गुणकारक : स्त्रियांना पाळीच्या तक्रारीत जाईची फुले चावून, तांदळाच्या धुवनाबरोबर खायला द्यावीत . जाई आर्तवजनन गुणांची असल्याने पाळीच्या तक्रारी दूर करते.