२०२० या संपूर्ण वर्षात कधीही मनात न आलेल्या गोष्टी घडत आहेत. कोरोना चे सावट, इतिहासात पहिल्यांदा ठप्प झालेली भारतीय रेल्वे, बॉलीवूड मधील अनेक दिग्गज कलाकार यांचे नि ध न, निसर्ग वादळ यांसारख्या संकटाना भारत देश तोंड देत होताच अशातच आता अजून एक दुःखद वार्ता समोर आले ती म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातून निवृत्ती घेतली आहे. २०१९ मध्ये इंग्लंडला झालेल्या विश्वचषका नंतर धोनी कुठल्याच क्रिकेट सामन्यांमध्ये दिसला नव्हता. भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व कॅप्टन आणि दमदार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी सर्वांचाच लाडका क्रिकेटर आहे. धोनी त्याच्या लांबच लांब सिक्सर, फिनिशर ची भूमिका, उत्कृष्ट कॅप्टन, आणि शांत डोकं ठेवून विचार करण्याच्या पद्धती सोबत त्याच्या साधेपणा साठी विशेष ओळखला जातो. आज आम्ही तुम्हाला धोनी बदल अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या त्याला इतरांपासून वेगळे ठरवतात.
१) महेंद्रसिंग धोनी क्रिकेट विश्वातील असा एकमेव कॅप्टन आहे ज्याने आय सी सी द्वारा आयोजित केलेल्या तीन मोठ्या ट्रॉफी आयसीसी वर्ल्ड टी२० (२००७), क्रिकेट वर्ल्ड कप (२०११), आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३) स्वतःच्या नावावर केल्या.
२) क्रिकेट जगतात धोनी कितीही प्रसिद्ध असला तरीही क्रिकेटच्या आधी फुटबॉल हे धोनीचे पहिले प्रेम होते. शाळेत असताना धोनी शाळेच्या फुटबॉल टीम मध्ये गोलकीपर असायचा. ३) मोटर रॅसिंग करायला धोनीला खूप आवडते. मोटार रेसिंग टीम मध्ये एका टीमचा धोनी मालक सुद्धा आहे. ४) आंतरराष्ट्रीय क्रिकेट दुनियेत धोनीने जेव्हा पाऊल ठेवले त्या वेळी त्याचे केस खूप मोठे होते. त्यावेळी धोनी बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या केसांचा खूप दीवाना होता. त्यामुळे स्वतःची सुद्धा त्याने तशीच हेअर स्टाईल ठेवली होती. ५) बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये धोनीने त्याला इंडियन आर्मी मध्ये भरती व्हायचे त्याचे स्वप्न होते असे बोलून दाखवले होते. २०११ मध्ये धोनीला भारतीय सेनेत मानद लेफ्टनंट कर्नल बनवले.
६) २०१५ मध्ये दुनियेने धोनीला हवेत उडताना पाहिले. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील इंडियन आर्मीच्या पॅरा रेजीमेंट मधून धोनीने पॅरा जंपिंग केले होते. विशेष म्हणजे तेव्हा धोनी पॅरा जम्पिंग करणारा पहिला खेळाडू ठरला. पॅरा ट्रूपर ट्रेनिंग स्कूल मधून प्रशिक्षण घेतल्यानंतर माहीने १५००० फुट उंचीवरून पाच उड्या मारून इतिहास रचला. ७) महागड्या बाइक्स आणि कार साठी माही खूप शौकीन आहे. ८) धोनी कडे २४ हून अधिक आधुनिक बाईक्स आहेत. तसेच हमर सारख्या महागड्या कारचा तो मालक आहेत. ९) क्रिकेट आणि जाहिरातींत मार्फत धोनीने बक्कळ पैसा कमावला आहे. दुनियातील सर्वात महागड्या क्रिकेटर्स पैकी धोनीला एक मानले जाते.
भारतीय टीम इंडियासाठी दुसरी धक्कादायक बातमी म्हणजे महेंद्रसिंग धोनी पाठोपाठ भारतीय क्रिकेटर आणि चेन्नई सुपर किंग्स मधील खेळाडू सुरेश रैनाने सुद्धा माही सोबत निवृत्ती स्वीकारली.