शाळेत असताना सर्व विद्यार्थ्यांचे काही विषय हे आवडीचे असतात तर काही विषय नावडीचे असतात त्यातूनच गणित विषय म्हटला तर भलेभले याच्या अंगावर काटा येतो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मसावि आणि लसावि, वर्गमूळ घनफळ, क्षेत्रफळ या सर्वांचा विचार केला तर कुठेतरी डोकेदुखी सुरू व्हायला लागते परंतु या सर्वांवर मात करुन एक अवलिया आज जागतिक पातळीवर मानवी कॅलक्युलेटर च्या रूपात अव्वल ठरला आहे. त्याने सर्वसाधारण पणे जी काही भीती गणित विषयाबद्दल लोकांच्या मनामध्ये असते त्या भीतीला छेदून एक नवीन रेकॉर्ड रचला आहे, चला तर जाणून घेऊया त्याबद्दल.
हैदराबाद मधील नीलकंठ भानु हा प्रत्येक वेळी अंकाच्या बाबतीत विचार करत असतो आणि आता तर तो जगातील सर्वात जलद मानवी कॅलक्युलेटर आहे. अगदी वीस वर्षाच्या वयात त्याने मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. भानु सांगतात कि, गणित मेंदूचा एक मोठा खेळ आहे आणि गणिताच्या भीतीला ते पूर्णपणे संपवू पाहतात. ते मानसिक गणिताची तुलना स्प्रिंटिंग सोबत करतात. भानू सांगतात की, वेगाने धावणाऱ्या वर कोणीच प्रश्न उठवत नाही परंतु मानसिक गणिताला घेऊन नेहमी अनेक प्रश्न उठवले जातात.
गणिता सोबतचा प्रवास भानू यांचा वयाच्या पाचव्या वर्षापासून सुरू झाला तेव्हा त्यांच्यासोबत एक दुर्घटना झाली होती. त्यांच्या डोक्याला एक जखम झाली आणि ते एका वर्षाकरीता अंथरुणाला खिळून बसले होते. त्यांनी सांगितले की माझ्या आई-वडिलांनाही सांगितले गेले होते की माझ्या पाहण्या च्या, ऐकण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडू शकतो तेव्हा मी माझ्या मेंदूला व्यस्त ठेवण्या करिता गणिताचे कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात केली. भानू सांगतात की, भारतातील मध्यमवर्गीय परिवारा मधून येणारा व्यक्ती सर्वसाधारण असा विचार करतो की , तो एक चांगला जॉब करून लवकरच सेटल होऊन जाईल तसेच आपण एखादा व्यवसाय सुरू करावा. गणितासारख्या क्षेत्रात जाण्याचे खूप कमी विचार केला जातो परंतु अंकांकडे त्यांचा रोख नव्हता पण आवड होती. याच कारणामुळेच भानू यांनी गणित विषयामध्ये पदवी घेण्याचे ठरविले आणि त्यांची पदवी सुद्धा आता लवकरच पूर्ण होणार आहे.
मेंदू चा सर्वात मोठा खेळ – मोठ्या स्तरावरील अन्य स्पर्धका प्रमाणेच भानू सुद्धा आपल्या तयारीला यशस्वी होण्यामागील महत्वाचे कारण सांगतात. ते म्हणतात की हे एवढं सोपं नाही आहे की आपण एकाच टेबलवर बसलो आणि वाचत आहोत परंतु हा मेंदूचा सर्वात मोठा असा खेळ आहे. मी फक्त स्वतःला एक जलद गणित तज्ञच्या अनुषंगाने जलद विचार करणारा असा व्यक्ती म्हणून स्वतःला तयार केले आहे. लहानपणी भानू शाळेतून आल्यानंतर सहा ते सात तासापर्यंत घरी सराव करत असायचे परंतु चॅम्पियनशिप आणि रेकॉर्ड बनवल्यानंतर ते प्रत्येक दिवशी एवढे सराव नाही करत असे . याशिवाय आता ते वेगळ्या पद्धतीने सराव करतात याबद्दल ते सांगतात की , “मी प्रत्येक वेळी अंकाबद्दल विचार करत असतो”. भानू सांगू इच्छितात की, मी तीव्र ध्वनीत संगीत वाजवून प्रॅक्टिस करतो , यादरम्यान लोकांशी संवाद साधतो , त्यांची भेट घेतो आणि क्रिकेट सुद्धा खेळतो ,कारण यामुळे तुमचा मेंदू एकाच वेळी अनेक गोष्टी पूर्ण करण्यासाठी तयार होत असतो.
🥇 for India at Mental Calculation World Championship, MSO 🇬🇧
4 World Records – Fastest Human Calculator
These are just titles. My vision is to eradicate math phobia in 🇮🇳 and with @expinfi I reached to over a 2L students this lockdown though a project. There's a long way to go pic.twitter.com/DVJSrUFoIN— Neelakantha Bhanu Prakash J (@bhanuprakashjn) August 24, 2020
भानू पुढे सांगू इच्छितात की, आपल्या जवळून जाणाऱ्या प्रत्येक टॅक्सीच्या नंबरला मी जोडत राहतो म्हणजेच त्यांची बेरीज करत असतो जर मी एखाद्या व्यक्ती सोबत बोलत असतो तेव्हा ते मोजत सुद्धा असतो की तो व्यक्ती कितीवेळा डोळ्याच्या पापणी ची हालचाल करत आहे. हे सारे ऐकण्यास खूप विचित्र असले तरी या साऱ्या गोष्टींमुळे तुमचा मेंदू नेहमी गतिशील राहतो.
“लोकांना प्रोत्साहित करायचे आहे.” – मी सांगू इच्छितो की रेकॉर्ड आणि कॅलक्युलेशन हे फक्त व्यक्त होण्याचा मार्ग आहे की जगाला गणितज्ञांची गरज आहे आणि गणित आपल्यासाठी एक मजेदार विषय होणे गरजेचे आहे. लोकांनी असे म्हटले पाहिजे की हा विषय खूपच आवडीचा आहे .माझे खरे ध्येय हे आहे की लोकांच्या मनातून गणित या विषयाबद्दलची जी काही भीती आहे ती लवकरात लवकर पळून गेली पाहिजे आणि ते गणित विषयांमध्ये स्वतःला यशस्वी करू शकतील.
बनविले चार जागतिक रेकॉर्ड – भानु यांनी चार जागतीक रेकॉर्ड आणि अन्य अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहे. भानू यांच्या कुटुंबाला आपल्या मुलावर प्रचंड अभिमान आहे. भानू यांनी सांगितले की जेव्हा मी माझी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली तेव्हा माझ्या काकांनी सांगितले होते की , मला स्वतःला एवढंच जलद बनवणे गरजेचे आहे की आजपर्यंत कोणीच असे जलद झाले नसेल. मी कधी असा विचारही केला नव्हता की मी जगातील सर्वात जलद मानवी कॅल्क्युलेटर बनेल. हा लेख आपल्यास आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका.