बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्या प्रकरणाची केस भलेही सीबीआय तपासणार असली तरीही या प्रकरणाबाबत आधीच वेगवेगळे खुलासे होत आहेत. नुकतीच सुशांतची एक डायरी समोर आली ज्यात त्याने संपूर्ण वर्षभराची प्लॅनिंग लिहून ठेवली होती. सुशांतला एक स्वतःचे प्रॉडक्शन हाउस खोलायचं होते या प्लॅनमध्ये त्याच्या बहिणीला सुद्धा सहभागी करणार होता. बॉलीवूड पासून ते हॉलीवुड पर्यंत सुशांतला त्याचे नाव गाजवायचे होते. यासाठी त्याने तयारीसुद्धा सुरू केली होती. यासाठी एक प्रोजेक्ट तयार केला होता. सुशांतने हा प्रोजेक्ट एकदम प्रोफेशनली बनवला होता. मात्र नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. ही डायरी समोर आल्यावर तो त्याच्या बहिणींवर खुप प्रेम करायचा हे स्पष्ट झाले.
प्रोडक्शन हाऊस बनवण्याचा प्रोजेक्ट मध्ये त्याने त्याच्या बहिणीला सुद्धा सहभागी करून घ्यायचे ठरवले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या डायरीमध्ये लिहिले होते की त्याला २०२० मध्ये हॉलीवूड मध्ये पदार्पण करायचे होते. तसेच या संपूर्ण वर्षात ५० करोड रुपयांची संपत्ती त्याला बनवायची होती. त्यासाठी आधीपासूनच त्यांनी खूप मेहनत सुरू केली होती. सुशांतच्या जवळील व्यक्तीने सांगितले की तो हॉलीवुड चित्रपटांसाठी सुद्धा खूप प्रयत्न करत होता.
यासोबतच सुशांतच्या परिवाराचे नऊ पानांचे पत्रसुद्धा समोर आले आहेत. या पत्रामुळे सध्या त्याच्या परिवारावर लागलेल्या आरोपांचे खंडन होऊ शकले. त्यात लिहिले होते की सुशांत सोबत जे झाले ते कोणा दुश्मना सोबत पण होऊ नये. सोबतच अशा काही कलाकारांबद्दल लिहिले होते जे स्वतःला दिवंगत अभिनेत्यांचे नातेवाईक म्हणजेच भाचा, नातू, नात ,पुतणी , भाऊ किंवा अन्य नातं आहे असे सांगतात. या पत्राची सुरुवात एका शायरी ने केली आहे. त्यानंतर पुढे लिहिलेल्या प्रत्येक शब्दातून सुशांतच्या परिवाराचे दुःख समोर येते.
मृत्यूपूर्वी सुशांतने त्याच्याजवळील लोकांना हे आता माझा पाठलाग सोडणार नाहीत असे म्हणाला होता. याबाबतचा खुलासा सुशांत ची मैत्रीण स्मिता ने केला आहे. त्याला कोण ध म की देत आहे, कोण सतत त्याला ब्लॅ क मे ल करत होते हे रहस्य फक्त सुशांतलाच माहीत होते. सुशांत मानसिक रुग्ण आहे असे त्याला भासवून त्याचे करिअर बरबाद करण्याची ध म की रिया चक्रवर्ती देत असल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला. सुशांतच्या परिवाराचे म्हणणे आहे की रिया चक्रवर्ती सुशांतला सतत ध म की द्यायची. मात्र या सर्व ष ड यं त्र मध्ये रियासोबत कोणी अजून सामील होते की तिने हे सर्व एकटीने केले हा प्रश्न मागे उरतो. हे सर्व रिया ने तिच्या परिवाराला विश्वासात घेऊन केले की त्यांना अजून सुद्धा कोणी मदत केली या सर्व गोष्टींचा तपास सध्या चालू आहे. या सर्व गोष्टी रिया सोबतच्या चौकशीमध्ये तसेच तिच्या फोन डिटेल्समध्ये स्पष्ट होतील.
या सर्व प्रकरणात सुशांत सिंह राजपूत ची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या आ*त्म*ह*त्या प्रकरणाचा गुंता सोडवणं सुद्धा महत्त्वाचे असल्याचे बोलले जाते. दिशा आणि सुशांत च्या आ*त्म*ह*त्या मध्ये काहीतरी संबंध असल्याचा संशय पटना पोलिसांना आहे. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पोलीस मुंबईत आले होते मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना हा तपास करू दिला नाही शिवाय कोणत्याही प्रकारची मदत पण केली नाही. आता दिशाच्या जवळील व्यक्ती तिच्या आ*त्म*ह*त्ये*बाबत बोलण्यास खूप कचरत आहेत. त्यामुळे दिशाच्या जवळील व्यक्तींना किंवा तिच्या मित्रांना तोंड उघडण्याची ध म की कोणी दिली तर नाही ना हे प्रश्नचिन्ह सध्या तयार झाले आहे.