दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*साठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती ला मुख्य आरोपी मानले जात आहे. या आ*त्म*ह*त्या प्रकरणाची केस सुशांत चे वडील केके सिंह यांच्याकडून विकास सिंह लढवत आहेत तर अभिनेत्री रिया चक्रवर्ती कडून एडवोकेट सतीश मानशिंदे लढवत आहेत. मागील काही दिवसांपासून सतीश मानशिंदे यांच्या फि वरून अनेक चर्चा होत होत्या. अशातच आता स्वतः सतीश मानशिंदे यांनी याबाबत तोंड उघडले आहे.
नुकतेच सतीश मानशिंदे यांनी एका मीडिया हाउस सोबत बोलताना अभिनेत्री रिया चक्रवर्ती कडून मिळणाऱ्या फी बाबत सांगितले. सतीश आणि सांगितले की दहा वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका लेखाद्वारे मी १० लाख रुपये फी घेतो असे अनुमान बांधले जात आहे. पण तुम्ही दहा वर्षांपूर्वीचे आर्टिकल का पाहता? असे असेल तर या अनुषंगाने दहा वर्षानंतर माझी फी जास्त असायला हवी. सतीश यांनी पुढे सांगितले की मी माझ्या क्लाएंटस् कडून जी काही फी घेतो याचा इतरांशी काही मतलब नाही. इन्कम टॅक्स ला जर जाणून घ्यायचे असेल तर मी त्यांना योग्य ते उत्तर देईन. त्यामुळे माझी किंवा माझ्या क्लाइंट बाबत आमच्या खासगी बाबीतील चर्चा व्हाव्यात असे मला वाटत नाही.
मध्यंतरी रिया चक्रवर्ती ने तिच्या घराचे हप्ते भरण्याबाबत एका मिडिया हाऊस सोबत बोलताना सांगितले होते. तिच्या त्या वक्तव्यावर सुशांत सिंह राजपूत ची बहिण श्वेता सिंह कीर्तीने निशाणा साधला. श्वेताने ट्विट करून म्हटले की, तुला दर महिना १७००० रुपये तुझ्या घराचे हप्ते कसे जाणार याची चिंता आहे तर तू देशातील सगळ्यात महागड्या वकीलाला हायर केलेस मग त्यांना त्यांची फी कशी देतेस?
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत चा मृ त दे ह १४ जूनला त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी आढळला होता. सुरुवातीला सुशांत चा मृत्यू आ*त्म*ह*त्या असल्याचे सांगितले जात होते मात्र जेव्हा सुशांत चे वडील केके सिंह यांनी जेव्हा पटना मध्ये एफ आय आर दाखल केली त्यानंतर या केसचा संपूर्ण चेहराच बदलला. सुशांत च्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या परिवारावर अनेक गंभीर आरोप लावले. सध्या या केसचा तपास सीबीआयची टीम करत आहे. मात्र सध्यातरी ही ह*त्या असल्याचे कोणतेही पुरावे सीबीआयच्या हाती लागलेले नाही.