दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*ला आता अडीच महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र सुशांतचा मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला याचे र*ह*स्य अजून उघडले नाही. १४ जून ला सकाळी असे काय घडले होते ज्यामुळे सुशांत ने आ*त्म*ह*त्या केली याचे कारण अजून समजलेले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयची टीम करत आहे. याप्रकरणी ड्र*ग अँगल समोर आल्यानंतर या प्रकरणात अनेक लोकांच्या नावाचा खुलासा झाला. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस स्टाफ सॅम्युअल मिरांडा सोबत अन्य काही ड्र*ग पॅडलर्स ची नावे समाविष्ट आहेत.
तसेच या प्रकरणी शुक्रवारी अचानक ना को र्ट‍ि क्स कंट्रोल ब्यूरोच्या टीमने रिया चक्रवर्ती सोबत या केसशी संबंधित अन्य काही लोकांच्या घरावर छापा टाकला. तेथे त्यांच्या हाती काही मोठ्या गोष्टी लागल्यामुळे ना को र्ट‍ि क्स कंट्रोल ब्यूरोच्या टीमने शौविक चक्रवर्ती ला अटक केली.

शौविक चक्रवर्ती ला अटक केल्यानंतर सुशांत सिंह राजपूत ची बहिण श्वेता सिंह कीर्ती आणि त्याची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे ने प्रतिक्रिया दिल्या आहेत. अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर ओम लिहिलेला फोटो पोस्ट केला व त्या फोटोखाली कॅप्शन मध्ये ‘हर हर महादेव’ लिहिले व त्या फोटोमध्ये हैशटैग सत्यमेव जयते, ट्रूथ विन्स आणि जस्टिस ऑफ सुशांतचा वापर केला.
अंकिता सोबतच शौविकला अटक झाल्यानंतर सुशांत ची बहिण श्वेता सिंह कीर्तीने सुद्धा प्रतिक्रिया दिली. श्वेताने इंस्टाग्राम वर पोस्ट टाकत म्हंटले की आशीर्वादाच्या ताकदीवर कधीच संशय घेऊ नका. तसेच ती पुढे म्हणाली की, अशीच प्रार्थना करत राहा प्रार्थना काम करते. अंकिता लोखंडे व सुशांत ची बहिण श्वेता सिंह कीर्ती सतत सुशांत साठी न्याय मागत आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांतच्या परिवाराच्या कठीण काळात त्यांच्या सोबत खंबीर उभी आहे.
आज या प्रकरणाचा तपास घेण्यासाठी सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली होती. तेथे एम्सच्या तीन फॉरेन्सिक डॉक्टरांसोबत, सिद्धार्थ पिठानी, केशव आणि सुशांतची मोठी बहीण मीतू सिंह यांच्या उपस्थितीत क्रा ई म सीन रिक्रिएट केला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *