दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्या प्रकरणात नक्की काय होणार याची उत्सुकता लागली असतानाच अभिनेत्री रिया चक्रवर्ती ला एन सी बी च्या टीमने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूत च्या प्रकरणात ड्र*ग्स संबंधी रियाला आज अटक झाली. गेल्या तीन दिवसांपासून एन सी बी द्वारे रियाची सतत चौकशी चालू होती. आता रियाला मेडिकल टेस्ट साठी घेऊन जाण्यात आले आहे.
रियाला एन डी पी एस कलम ८ सी, कलम२८, कलम२९ अंतर्गत अटक केली आहे. जर रियावर केलेले आरोप सिद्ध झाले तर रियाला कलम ८सी अंतर्गत सहा महिन्यांसाठी जे ल व दंड, कलम २९ अंतर्गत आरोपांवरून शिक्षा, आणि कलम २८ अंतर्गत दहा वर्षांची जे ल आणि एक लाखाचा दंड होऊ शकतो.
रविवारी ती पहिल्यांदा एन सी बी समोर पेश झाली होती तेव्हा तिची सहा तास चौकशी झाली. सोमवारी पुन्हा एकदा एन सी बी च्या दोन टिमने तिची आठ तास चौकशी केली. साधारण १९ तासांच्या चौकशीनंतर एन सी बी च्या टीमने मंगळवारी रियाला अटक केली. त्यानंतर दिला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात सादर केले जाईल. याशिवाय रिया चक्रवर्ती ची कोरोना टेस्ट केली त्यामध्ये तिची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
सोमवारी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी रिया चक्रवर्ती ने बांद्रा पोलीस स्थानकात सुशांत ची बहीण प्रियंका सिंह विरोधात तक्रार नोंदवली. त्याआधी ५ सप्टेंबरला रिया चक्रवर्ती चा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस हेल्पर दीपेश सावंत आणि सुशांत चा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला अटक केली. सुशांत च्या मृत्यूनंतर सुरुवातीला बॉलिवूडमधील घराणेशाही मुळे ही आ*त्म*ह*त्या झाल्याचे म्हटले जात असतानाच अचानक सुशांत चे वडील केके सिंह यांनी पटना पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतला आ*त्म*ह*त्या करण्यास प्रवृत्त केले व त्याचे पैसे उखळल्याची तक्रार नोंदवली.
त्यानंतर सगळीकडून सीबीआय तपासणीची मागणी होऊ लागली व ती मागणी मान्य झाल्यावर अचानक या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. ड्र*ग्स कनेक्शन समोर आल्यावर या प्रकरणाचा तपास एन सी बीकडे सुद्धा सोपवण्यात आला. अखेर एन सी बी च्या तीन दिवसांच्या चौकशीनंतर रिया चक्रवर्ती ला अटक झाली.