साऊश सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी नि ध न झाले. आंध्रप्रदेशच्या गुंटूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृ दय वि का रा च्या झ ट क्या ने जयप्रकाश रेड्डी यांचे मंगळवारी सकाळी नि ध न झाले. साउथ कडील सुपरस्टार जय प्रकाश रेड्डी यांना आपण साउथ चित्रपटांमध्ये विनोदी कलाकार किंवा कधीकधी खलनायक म्हणून पाहिले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार जयप्रकाश रेड्डी यांना बाथरुममध्ये हृ दय वि का रा चा झ ट का आला आणि ते खाली को स ळ ले. रेड्डी हे कुर्नूलच्या अल्लागड्डा येथील आहेत. १९८० पासून त्यांनी अनेक सिनेमात काम केले होते. अलीकडे साऊथचे सिनेमे हिंदीमध्ये डब करुन दाखवले जातात. यात जयप्रकाश रेड्डी यांची भूमिका हमखास प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. आज दुर्दैवाने त्यांचे नि ध न झाले.
तेलुगु सिनेमात त्यांना जेपी नावाने ओळखलं जायचं. जयप्रकाश रेड्डी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९८८ मध्ये आलेला तेलगू चित्रपट ब्राम्हा पुत्रुडू मधून केली होती. १९९९ मध्ये समारासिम्हा रेडी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि रातोरात त्यांची ओळख जगाला समजली. या चित्रपटानंतर त्यांच्या करिअरची गाडी सुसाट सुटली व एकापाठोपाठ एक चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनात त्यांनी स्वतःचे स्थान पक्के केले.
प्रकाश रेड्डी यांचे घर हैदराबाद मध्ये होते तेथे त्यांच्या कुटुंबासोबत राहायचे. त्यांच्याकडे ऑडी आर ८, आणि ऑडी क्यू ७, ३५ लाखांची टोयोटा फॉर्च्यूनर यांसारख्या वेगवेगळ्या महागड्या गाड्या होत्या. जय प्रकाश रेड्डी एका चित्रपटात अभिनय करण्यासाठी ८० ते ९० लाख रुपये फी घ्यायचे. द टॉप एव्हरीथिंग या युट्युब चॅनेल आणि ट्रेंडसेलेब्सनाऊ.कॉम या संकेतस्थळाच्या माहितीनुसार त्यांची निव्वळ संपत्ती १ मिलियन ते ५ मिलियन डॉलर इतकी आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !