अक्षय कुमारने या कारणामुळे बदलले स्वतःचे नाव, जाणून घ्या त्यामागचे कारण !

133

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारचे फक्त भारतातच नव्हे तर देशाला विदेशात सुद्धा फॅन्स आहेत. अक्षय कुमार कधी त्याच्या अभिनयामुळे तर कधी त्याच्या दया ळू वृत्तीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण करतो. देशा-विदेशात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या खिलाडी कुमारचा म्हणजेच अक्षय कुमारचा नुकताच वाढदिवस झाला. बॉलीवूड मध्ये खिलाडी कुमारला अक्षय कुमार म्हणून ओळखले जाते मात्र अक्षय कुमार चे खरे नाव राजीव भाटिया असे आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी अक्षय कुमार ला राजीव भाटिया या नावानेच ओळखले जायचे. मात्र अभिनेता म्हणून काम करायला लागल्यावर त्याने राजीव हे नाव बदलून अक्षय कुमार असे ठेवले.
अक्षय कुमार पहिल्यांदाच महेश भट यांच्या आज या चित्रपटामध्ये मोठ्या पडद्यावर दिसला होता. हा चित्रपट १९८७ मध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटामध्ये अक्षय चा खूप छोटा रोल होता. या चित्रपटात एका क रा टे इन्स्ट्रक्टरची भूमिका पार पाडली होती. तसे पाहायला गेल्यास ‘आज’ या चित्रपटात अक्षय कुमारचा काही सेकंदाचा रोल होता मात्र त्यानंतर सौ गं ध या चित्रपटातून त्याने प्रमुख अभिनेता म्हणून करियरची सुरुवात केली. ‘आज’ या चित्रपटात पूर्वी अक्षय कुमार राजीव भाटिया या नावानेच ओळखला जायचा.
‘आज’ या चित्रपटात कुमार गौरव यांनी प्रमुख भूमिका पार पाडली होती. त्या चित्रपटात कुमार गौरव यांचे नाव अक्षय होते. अक्षय कुमारने स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितले की तो त्याच्या पहिल्या चित्रपटा वेळी सेटवर बसून कुमार गौरव यांना पाहत राहायचा कारण त्या चित्रपटात त्यांचे नाव अक्षय कुमार होते. त्यानंतर अक्षय कुमार ने पुढे जाऊन अजून चित्रपट करण्यापूर्वी स्वतःचे नाव बदलून घेतले. अक्षय कुमार ने सांगितले कि आज या चित्रपटानंतर त्याने को र्टा त जाऊन राजीव भाटिया चे नाव अक्षय कुमार करून घेतले.
अक्षय कुमार ला त्या वेळी कुमार गौरव यांचे स्क्रीन वरील नाव खूप आवडले होते. या नावावरूनच त्याने स्वतःचे नाव ठेवायचे ठरवले. नाव बदलल्यानंतर त्याने इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली. मा र्श ल आ र्ट चॅम्पियन असलेल्या अक्षय कुमारने स्वतःच्या वेगवेगळ्या ऍ क्श न च्या जोरावर लोकांना वेड लावले. सध्या अक्षय कुमार एका वर्षात सर्वाधिक चित्रपट करणारा व चित्रपटात मार्फत सर्वाधिक पैसे कमावणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो.