आता माझी सटकली या फेमस डायलॉग प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा बाजीराव सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगन ने बॉलीवूड मध्ये अनेक हिट चित्रपट दिले. सध्या अजय बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक व निर्माता म्हणून काम करतो. अजय देवगन चा जन्म २ एप्रिल १९६९ मध्ये दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. अजय देवगन चे कुटुंब व बॉलीवुड हे एक जुने समीकरण आहे. अजय देवगन चे वडील नीलु देवगन हे बॉलिवूडमधील असिस्टंट कोरिओग्राफर आणि ॲक्शन फिल्म दिग्दर्शक होते. तर आई मीना देवगन या चित्रपट निर्माती होत्या.
अजय देवगन ला हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत अजय देवगन ने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आतापर्यंत त्याला त्याच्या कामाप्रती एकूण ३२ पुरस्कार मिळाले आहेत यामध्ये २ राष्ट्रीय पुरस्कार,३ फिल्मफेअर अवॉर्ड, १ झी सिने अवॉर्ड यांचा सहभाग आहे. अजय देवगनचे अभिनेत्री काजल सोबत लग्न झाले असले तरीही तिच्या आधी त्याच्या आयुष्यात तीन गर्लफ्रेंड होत्या. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
करिष्मा कपूर –
फुल और काटे या चित्रपटानंतर अजय देवगन ला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. या चित्रपटांमध्ये अधिकतर चित्रपट अभिनेत्री करिष्मा कपूर सोबत होते. यामध्ये जिगर, धनवान, सुहाग, शक्तिमान आणि संग्राम यांसारख्या चित्रपटांचा समावेश होता. हे दोघे सेटवर खूप वेळ एकमेकांसोबत घालवायचे. असे म्हटले जाते की त्याकाळी करिश्मा अजय कडे आकर्षित झाली होती.
त्यांच्या प्रेमाच्या रोमान्सच्या चर्चा सर्वत्र होऊ लागल्या होत्या. त्याकाळी या दोघांच्या प्रेमाला उधाण आले होते मात्र अचानक ते दोघे वेगळे झाले.
रविना टंडन-
अभिनेत्री करिष्मा कपूर सोबत ब्रेकअप झाल्यावर अजय देवगन अभिनेत्री रविना टंडन च्या प्रेमात पडला. असे म्हटले जाते की रवीना मुळेच करिष्मा व त्याचा ब्रेक-अप झाला होता.
अजय व रवीना ने मिळून रास्ता, दिव्यशक्ती, दिलवाले यांसारखे अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या प्रेमाच्या चर्चा वाढत गेल्या व प्रेमाचा बहर चढला असतानाच अचानक दोघांनी वेगळे मार्ग निवडले.
काजोल- हलचल या चित्रपटादरम्यान जेव्हा पहिल्यांदा काजोल व अजयची ओळख झाली त्यावेळेस अजयला काजोल आवडली नव्हती. एका इंटरव्ह्यूमध्ये अजयने सांगितले होते की पहिल्या भेटीतच काजोल अजयला खूप घमेंडी, गोंधळ घालणारी, बडबडी मुलगी वाटली होती. काजोल खूप बोलणारी मुलगी होती तर अजय खूप शांत राहणारा मुलगा होता. दोघेही एकमेकांच्या विरुद्ध टोकाचे होते व हीच गोष्ट त्यांच्या एकमेकांच्या आकर्षणाची गोष्ट ठरली.
दोघांची मैत्री झाली व केव्हा ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाच कळले नाही.ज्यावेळी या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला त्यावेळी मीडियाने त्यांच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टी प्रसिद्ध केल्या होत्या. मीडियामध्ये म्हटले गेले होते की दोघांच्या परिवारात खूप अंतर असल्यामुळे या दोघांचे लग्न जास्त काळ टिकणार नाही. मात्र १९९९ मध्ये झालेले त्यांचे लग्न इतकी वर्ष झाली तरी अजूनही सुखाने टिकले आहे. सध्या इंडस्ट्रीमधील क्युट कपल म्हणून त्यांना ओळखले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *