जब वी मेट, उडता पंजाब ते नुकताच येऊन गेलेला बहुचर्चित कबीर सिंग या चित्रपटातून आपल्या अभिनयाचे प्रदर्शन करून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारा अभिनेता शाहिद कपूर हा बॉलीवुड इंडस्ट्री मधील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहिद कपूरला एशियातील हँडसम अभिनेता म्हटले जाते. शाहिद कपूरचे मीरा राजपूत सोबत लग्न झाले असून तो आता दोन मुलांचा पिता आहे. लग्नाआधी शाहिद कपूरचे नाव बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्रीं सोबत जोडले गेले होते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी शाहिद कपूर त्याच्या लव लाइफ मुळे अनेकदा चर्चेत असायचा. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जिच्यावर एकेकाळी शाहिद कपूर भरपूर प्रेम करायचा. चला तर मग जाणून घेऊ कोण आहे ही अभिनेत्री.
हे अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसुन बॉलीवुडची नामांकित अभिनेत्री विद्या बालन आहे. विद्या बालन आता ४० वर्षांची आहे. तिने शाहिद कपूर सोबत लव कनेक्शन या चित्रपटात एकत्र काम केले होते. काही दिवसांपूर्वी शाहिद कपूर त्याची पत्नी मीरा राजपूत सोबत नेहा धुपिया च्या चॅट शोमध्ये गेला होता. या शोमध्ये शाहिद कपूर ने त्याच्या अफेयर्स बद्दल खुलेआम गप्पा मारल्या. दरम्यान नेहा धुपिया ने शाहिद कपूर ला विचारले होते की तू कधी तुझ्या कोस्टार च्या प्रेमात पडला आहेस का? यावर उत्तर देताना शाहिद कपूर म्हणाला की तो दोन अभिनेत्रींच्या प्रेमात पडला होता मात्र त्याच्या दोन्ही प्रेम कहाण्या अधुऱ्या राहिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार यातील एक अभिनेत्री म्हणजे विद्या बालन आहे. लग्नाआधी शाहिद कपूर विद्या बालन सोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांच्या अफेअरच्या चर्चा अनेकदा मीडियामध्ये व्हायच्या. तर अभिनेत्री म्हणजे करीना कपूर आहे. करीना कपूर व शाहिद कपूर ची लव स्टोरी जगप्रसिद्ध होती.
ते दोघे अनेक वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते मात्र अचानक काही कारणास्तव जब वी मेट या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये दुरावा आला आणि या दोघांनी स्वतःचे वेगवेगळे मार्ग अवलंबले. सध्या विद्या बालन तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर तर करीना कपूर तिचा पती सैफ अली खान सोबत सुखी संसार करत आहेत. शाहिद कपूर सुद्धा त्याची पत्नी मीरा राजपूत सोबत आनंदाने जीवन जगताना दिसतो.