गेले सहा महिने पेक्षा जास्त दिवस संपूर्ण जग कोरोना नावाच्या म हा मा री सोबत झ ग ड त आहे. या कोरोनाव्हायरस मुळे लाखो लोकांचे प्राण गेले. अनेकांची कुटुंबे उ ध्व स्त झाली. अनेकांच्या नोकरीवर ग दा आली. उद्योगधंदे ठप्प पडले. गेले सहा महिने संपूर्ण जगभर कोरोनाव्हायरस वर व्हॅक्सिंन बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. दरम्यान आता महत्वपूर्ण माहिती हाती लागली ती म्हणजे रशियाने आर फार्म द्वारा बनवल्या गेलेल्या कोरोनाव्हायरस वरील इलाजासाठी कोरोनावीर या औषधाला परवानगी दिली आहे.
कोरोनाविर पुढील आठवड्यात देशभरातील फार्मसीमध्ये पाठवले जाईल. कोरोनाची हलकी ते मध्यम लक्षणे असलेले पेशंट डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन द्वारे हे औषध खरेदी करू शकतात. शुक्रवारी कंपनीने कोरोनावीर बद्दल सांगितले की या औषधाला प्रिसक्रिप्शन ड्र ग म्हणून मंजुरी दिली असून पुढील आठवड्यात रशियातील सर्व मेडिकलमध्ये हे औषध उपलब्ध केले जाईल.
याआधी कोरोनाव्हायरस साठी एविफेविर या अजून एका रशियन ड्र गला परवानगी मिळाली होती. ही दोन्ही औषधे फेवीपिरवीरवर आधारित आहेत. ही औषधे जपानमध्ये बनवली जातात व व्हायरल आजारांच्या उपचारांसाठी वापरली जातात. आर फार्मच्या कोरोनावीरला मंजुरी मिळाल्यानंतर रशिया आता कोरोनाव्हायरस साठी वेक्सिन बनवणाऱ्या देशांच्या शर्यतीत पुढे गेला आहे. याआधी मॉस्को ने कोरोना वेक्सिन Sputnik-V बनवल्याचा दावा केला होता. शिवाय मॉस्को ने या वॅक्सिंन अनेक देशांसोबत करार देखील केले होते.
या औषधाला क्लिनिकल ट्रायल च्या तिसऱ्या टप्प्यात परवानगी दिल्याचे आर फार्म ने सांगितले. या क्लिनिकल ट्रायल साठी १६८ रुग्णांवर परीक्षण केले गेले. कोरोनाविर ला जुलैमध्ये उपचाराची परवानगी मिळाली होती. कोरोनावीरची चाचणी तुलनेने कमी लोकांमध्ये केली होती, म्हणजे त्यामध्ये केवळ 168 रुग्णांचा समावेश होता.
आर फार्म ने इतर कंपन्यां कडून ऑर्डर घेण्यासाठी बोलणी सुरू केली आहेत. कोरोनाविरचा पुरवठा पुढील आठवड्यात सुरू होऊ शकतो असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. ईशान्य मॉस्कोमध्ये असलेल्या कंपनीच्या सुविधेत कोरोनावीर वापरला जाऊ लागला आहे. Avifavir हे औषध जूनपासूनच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाले आहे मात्र अद्याप मेडिकल मध्ये उपलब्ध झालेले नाही.