बॉलीवूडमध्ये ऍक्शन पट भरपूर चालतात. यामध्ये काम करणारे हिरो या ॲक्शन पटसाठी भरपूर मेहनत घेतात. बॉलीवूड मध्ये अक्षय कुमार पाठोपाठ विद्युत जामवालला बॉलिवूडचा ॲक्शन हिरो म्हटले जाते. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी फिटनेस व त्याच्या बॉडीवर भरपूर मेहनत घेतली आहे. मागील काही दिवसांपासून विद्युत जामवाल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सर्वत्र होत होत्या. आता या चर्चांवर विद्युत तिने तोंड उघडले असून त्याने मान्य केले आहे की तो कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहे.
मीडिया रिपोर्ट ने दिलेल्या माहितीनुसार, विद्युत जामवालने इंटरनॅशनल ॲक्शन आयकॉन मायकल जाई वाईट सोबत चॅट शो केला होता. या शोमध्ये विद्युत ने सांगितले की त्याने नुकतेच एका मुली सोबत चालणे बोलणे सुरू केले आहे. स्वतःच्या रिलेशनशिप बाबत सांगण्याची विद्युत ची ही पहिलीच वेळ आहे. विद्युत ला ती मुलगी आवडते हे त्याने कबूल केले आहे. विद्युतने जरी त्याच्या रिलेशनशिप बाबत पहिल्यांदाच तोंड उघडले असले तरीही तो त्या मुलीला डेट करत असल्याचे त्याने सांगितले नाही.
याआधीही विद्युतचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले असून तो त्यांच्यासोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे अनेकदा चर्चेत आला आहे. विद्युत ने सर्वात शेवटी खुदा हाफिज या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटामध्ये विद्युत अभिनेत्री शिवालिका ओबेराय सोबत दिसला होता. या चित्रपटातील विद्युतचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता.
विद्युत बद्दल बोलायचे झाल्यास, विद्युतचा जन्म १० डिसेंबर १९८१ मध्ये जम्मू-काश्मीर विभागात झाला. विद्युत एक मार्शल आर्टिस्ट आहे. त्याने वयाच्या तिसऱ्या वर्षीच भारतीय मार्शल आर्ट कलरीपायट्टू चे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. विद्युत ने बॉलीवूड व्यतिरिक्त तमिळ व तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.
विद्युतने आतापर्यंत स्टेनली का डब्बा, फोर्स, कमांडो: ए वन मॅन आर्मी, बुलेट राजा, कमांडो २, बादशाहो, जंगली, कमांडो ३, यारा, खुदा हाफिज या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *