शोले चित्रपट बनवायला किती खर्च आला होता आणि किती रुपये त्याने कमावले, जाणून घ्या !

174

बॉलीवूड मध्ये काही सदाबहार चित्रपट आहेत जे अजूनही पाहिले तरी कंटाळा येत नाही. त्या चित्रपटांतील पात्र त्यांच्यातील संवाद हा प्रेक्षकांच्या अगदी तोंडपाठ झाले आहे. असाच एक सदाबहार चित्रपट म्हणजे शोले. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला शोले हा चित्रपट भारतीय ॲक्शनपट आहे. या चित्रपटात लेखक सलीम-जावेद होते. तर निर्माता गोपालदास सिप्पी होते.
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे काम गोपालदास सिप्पी यांचा मुलगा रमेश सिप्पीने केले होते. या चित्रपटाची कथा जय (अमिताभ बच्चन) आणि विरू (धर्मेंद्र) या दोन गुन्हेगारांवर केंद्रित केली आहे. या दोन गु न्हे गा रां ना डा कू गब्बर सिंह (अमजद खान) याचा बदला घेण्यासाठी निवृत्त पोलिस अधिकारी ठाकूर बलदेव सिंहने (संजीव कुमार) आपल्या गावी आणले असते.
अभिनेत्री हेमा मालिनी व जया भादुरी ने या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. भारतातील सर्वश्रेष्ठ चित्रपटांपैकी एक म्हणून शोले चित्रपटाची गणना होते.

शोले हा चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाचे बजेट ३० मिलियन म्हणजेच ३०० लाख रुपये होते. त्या काळाचीही हाय बजेट फिल्म होती. त्याकाळी या चित्रपटामुळे भारतात ३५० मिलियन म्हणजे ३५ करोड कमाई केली होती तर सोवियत युनियन मध्ये ६० मिलियन डॉलर झाली होती.
या चित्रपटाबाबत आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यावेळेस या चित्रपटाच्या बाबतीत निगेटिव फीडबॅक येऊ लागला होता. फिल्म क्रिटिक्सने या चित्रपटाला सुरुवातीला पसंती दिली नव्हती. १९९९ मध्ये बीबीसी इंडियाने या चित्रपटाला फिल्म ऑफ द मिलिनियम म्हणून घोषित केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !