वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवणे लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडतात. प्रत्येकाने त्यांच्या बालपणी वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवली असतील. आताच्या मोबाईलच्या दुनियेत वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजनाचे उपाय आपल्याला उपलब्ध झाले आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा वर्तमानपत्रात आलेली कोडी सोडवून लोक स्वतःचे मनोरंजन व वेळ घालवायचे.
काही काही कोडी इतकी कठीण असायची की ती सोडवण्यात संपूर्ण दिवस जायचा. मात्र आजच्या धावपळीच्या काळात वर्तमानपत्र घेऊन निवांत कोडी सोडवणे यासाठी कोणाकडे फारसा वेळ नाही. त्यामुळे प्रत्येक जण मोबाईलवरच आपापल्या परीने विरंगुळा शोधत असतात. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे एक कोडे आणले आहे. जे तुम्हाला विचारपूर्वक सोडवून त्याचे उत्तर द्यायचे आहे.
या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दोन समान दिसणारे फोटो देऊ. हे फोटो जरी तुम्हाला समान दिसत असले तरीही त्या दोन्ही फोटो मध्ये दोन वेगळे फरक आहेत. आम्ही जरी या कोड्याचे उत्तर तुम्हाला खाली दिलेले असले तरीही तुम्ही आधी तुमचे डोके लावून ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा.खाली दिलेल्या फोटोमध्ये एक मॉडेल फोटोसाठी पोझ देताना दिसते.हे फोटो जरी समान दिसत असले तरीही त्यामध्ये असलेले दोन फरक तुम्हाला ३० सेकंदात शोधून दाखवायचे आहेत.
फरक-
१) या फोटोतील पहिला फरक म्हणजे पहिल्या फोटोमध्ये मुलीने घातलेल्या टॉप मध्ये लंबवर्तुळाकार छेद देऊन एक डिझाइन तयार केली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये मुलीने घातलेल्या टॉप वर कोणत्याही प्रकारची डिझाईन नसून संपूर्ण टॉप प्लेन आहे.
२) ह्या फोटोतील दुसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोत मुलीच्या उजव्या म्हणजेच डोक्याकडे घेतलेल्या हातात बांगडी दिसते. तर हीच बांगडी दुसऱ्या फोटोमध्ये नाहीशी झालेली दिसेल. तुम्हाला हे कोडे आवडले असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *