एकदा का वधू वर विवाह बंधनात अडकले की त्यांचे पती पत्नीचे नाते हे साता जन्माचे असते असे म्हटले जाते. पती-पत्नी आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहतात. सोबत असणे म्हणजेच फक्त शरीराने एकत्र असणे नव्हे. दूर असून देखील मनाने एकत्र असणे हेसुद्धा पती-पत्नीच्या नात्यात महत्त्वाचे असते.
सध्याच्या धावपळीच्या युगात पत्नी त्यांच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. त्यामुळे कामाच्या रगाड्यात दररोज एकत्र राहणे जमत नाही. बॉलीवूड मध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांचे देखील असेच होते. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळा, दूरचे लोकेशन यामुळे अनेकदा कलाकारांना त्यांच्या जोडीदारासोबत अधिक काळ घालवता येत नाही. बॉलीवूड मध्ये अशी एक अभिनेत्री आहे जी तिच्या पतीला महिन्यातून केवळ एकदाच भेटते.
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे तिच्या अभिनयासोबतच तिच्या चित्रपटांच्या डिफरंट कन्सेप्ट साठी सुद्धा ओळखली जाते. राधिका निवडक चित्रपटांमध्येच काम करते. ज्या भूमिकेत दम असेल असेच चित्रपट राधिका साइन करते. विशेष म्हणजे राधिका चे लग्न झालेले असून तिच्या पति बाबत जास्त लोकांना ठाऊक नाही. राधिकाचा पती बेनेडिक्ट टेलर लंडनमध्ये म्युझिशियन आहे. या दोघांचे लग्न २०१२ मध्ये झाले होते.
भारतातील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री राधिका आपटे चे नाव सुद्धा घेतले जाते. राधिकाने तिच्या करिअरमध्ये तमिळ, तेलुगू, हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. राधिका तिच्या सौंदर्य तथा अदाकारी व तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. राधिकाने २०१२ मध्ये बेनेडिक्ट टेलर सोबत लग्न केले होते. यांच्या लग्नाला आता ७ सात वर्षे झाली असून राधिकाला अजून मूलबाळ नाही. राधिका अधिक तर तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायला मागत नाही मात्र यावेळी तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलेआम गप्पा मारल्या. मीडिया सोबत बोलताना राधिकाने सांगितले की तिच्या पतीला महिन्यातून केवळ एकदाच भेटते.
राधिकाने सांगितले, तिला अनेकदा लोक विचारतात की तुला एकटीला राहायला कंटाळा येत नाही का? त्यांना उत्तर देताना राधिका म्हणाली, अनेकदा एकाच छताखाली राहून देखील लोकांना एकटेपणा वाटतो. माझे आणि टेलर चे नाते खूप मजबूत आहे. काम करून घरी गेल्यावर मला थोडा एकटेपणा जाणवतो मात्र आता या सगळ्याची मला सवय झाली आहे. राधिकाला सर्वात शेवटी अंधाधुंद या चित्रपटात पाहिले गेले होते.

राधिकाने तिच्या पती बाबत सांगताना म्हटले की माझा पती विदेशात राहतो मात्र त्याला जेव्हा केव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा तो मला भेटण्यासाठी भारतात येतो. आम्ही दोघे कायम एकमेकांच्या काँटॅक्ट मध्ये असतो. आम्ही दोघे महिन्यातून एकदा एकमेकांना भेटतोच. मिळालेला एक दिवस सुद्धा मी खूप मस्त एकमेकांसोबत घालवतो. आणि उरलेले इतर दिवस या एका दिवसाच्या आठवणीच्या सहाय्याने घालवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *