मुली अधिकतर त्यांच्या वडिलांच्या जवळच्या असतात आणि मुलगे आईच्या! हे वाक्य सतत आपल्या कानी पडत असते. या वाक्यामागे बऱ्याच अंशी सत्यता आहे हे सर्वांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जाणवत असेल. कि मुली वडिलांच्या जास्त लाडक्या असतात पण असे नाही की मुलींना त्यांच्या आईविषयी प्रेम नसते किंवा आईला त्यांच्या मुली विषयी प्रेम नसते.

मुलगी वडिलांच्या कितीही जवळची असली तरीही मुलींमध्ये तिच्या आई मधील थोडेफार गुण हे असतातच. काही मुली तर त्यांच्या आईच्या अगदीच कार्बन कॉपी असतात. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे बॉलिवूड जगातील त्या आई व मुलीच्या जोड्यांबद्दल जाणार आहोत तुझ्या हुबेहुब एकमेकां सारख्याच दिसतात.

1. शर्मिला टागोर आणि सोहा अली खान – बॉलीवूड मधील आई व मुलीच्या जोड्या बद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री शर्मिला टागोर व त्यांची मुलगी सोहा अली खान यांची जोडी पहिल्या स्थानावर येते. तुम्ही फोटोमध्ये पाहूच शकता की या दोघींचा चेहरा एकमेकिंसारखा आहे. शर्मिला टागोर या एकेकाळच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तर सोहा अली खान हे आताच्या काळातील मॉडेल- अभिनेत्री आहे.
एवढे असूनही सोहा अली खान ला तिच्या आईप्रमाणे प्रसिद्धी मिळवता आलेली नाही. त्यामुळे तिने आता लेखन क्षेत्रात प्रवेश करून एक पुस्तक लिहिले आहे. अभिनेत्री सोहा अली खान चे लग्न गोलमाल सिरीज फेम बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू सोबत झाले.

2. अमृता सिंह आणि सारा अली खान – आई व मुलीच्या या यादीत पतौडी खानदानातील अजून एका आई व मुलीची जोडी सहभागी आहे. अमृता सिंह म्हणजे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची पहिली पत्नी. सैफ अली खान अमृता सिंह यांना इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत यातील सारा अगदीच तिच्या आई सारखी दिसते.
सारा अली खान सध्याच्या काळातील बॉलिवूडची टॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. साराने केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

3. डिंपल कपाडिया आणि ट्विंकल खन्ना – बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री मध्ये स्वतःचे भरपूर नाव कमावणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत बॉलीवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया चे नाव अग्रस्थानी येते. डिंपल यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ३१ वर्षीय बॉलीवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या सोबत लग्न केले होते.
पुढे जाऊन या दोघांच्या मुलीने सुद्धा आई-वडिलां प्रमाणे चित्रपट सृष्टीत करिअर करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला यामध्ये फारशी सफलता मिळाली नाही. मात्र अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हुबेहूब तिची आई डिम्पल प्रमाणेच दिसते.

4. हेमामालिनी आणि ईशा देओल – एकेकाळची ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली नामांकित अभिनेत्री हेमामालिनी यांनी चित्रपट सृष्टीत स्वतःच्या नावाचा दबदबा कायम ठेवला. हेमामालिनी ची मुलगी ईशा देवल हीसुद्धा एक अभिनेत्री आहे मात्र ईशाला तिच्या आई इतकी प्रसिद्धी मिळवता आली नाही. ईशा देओल चा चेहरा हेमामालिनी शी खूप मिळताजुळता आहे.

5. पूजा बेदी आणि अलाया फर्निचरवाला –
मायलेकींचा यादीमध्ये अभिनेत्री पूजा बेदी चे नाव सुद्धा सहभागी आहे जी एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. पूजा बेदी यांची मुलगी अलायाने सुद्धा नुकतेच तिचे फिल्मी करिअर सुरु केले आहे. या दोघींना तुम्ही जर जवळून पाहिलात तर अलाया सेम टू सेम पूजा बेदी यांची कार्बन कॉपी वाटेल.

6. सारिका आणि श्रुती हसन –
साउथ कडे सुपरस्टार कमल हसन यांनी अभिनेत्री सारिका सोबत लग्न केले. सारिका या सुद्धा एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या त्यांनी त्यावेळी अनेक हिट चित्रपट दिले होते. सारिका व कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन हीसुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते हे आपण सर्वजण जाणतो.
श्रुतीला तिच्या आई-वडिलां प्रमाणे अभिनयक्षेत्रात हवे तसे यश मिळाले नसले तरीही ती एक उत्तम गायिका आहे. नुकतेच श्रुती चे एक नवे गाणे प्रदर्शित झाले. श्रुती सुद्धा तिच्या आईप्रमाणेच हुबेहूब दिसते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *