ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे की जास्त हे ओळखायचं कसं? शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्याबद्दल काही लक्षणं आपल्याला पूर्वसूचना देतात. कोणती आहेत ती लक्षणं जाणून घेऊया. सध्या कोविड १९ या रोगाचा सर्वत्र बोलबाला आहे. या रोगामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते अशी लक्षणे दिसून येतात. मात्र कोरोना व्यतिरिक्त असे अनेक रोग आहेत ज्याद्वारे शरीरातील रक्ताची पातळी कमी होते.

हायपोक्सिया-
हायपोक्सिया म्हणजे शरीरातील कमी झालेली ऑक्सिजनची मात्रा. जेव्हा शरीरातील अंतर्गत अवयवांना, पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा आजार उद्भवण्याची शक्यता असते. काही वेळेस शरीरातील रक्तामधील अक्सिजन कमी होत जाते व याचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर दिसून येतो. यामुळे अनेकदा लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो तसेच शरीरात रक्तपुरवठा नीट होत नाही. पल्स ऑक्सीमीटर या यंत्राद्वारे ही क्रिया नीट चालते का हे तपासले जाऊ शकते.
हायपोक्सियाची लक्षणे-
या आजारामुळे धाप लागतो. श्वास कोंडल्या सारखे होणे हे हायपॉक्सियाचे प्रमुख लक्षण आहे. याकडे नीट लक्ष न दिल्यास हा त्रास हळूहळू वाढत जाऊ शकतो. श्वास घ्यायला त्रास झाल्यानंतर रक्तातील ऑक्सीजन ची मात्रा कमी होते. शरीरातील अवयवांना तसेच पेशींना प्राणवायू अत्यावश्यक असतो तो मिळाला नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात.

सर्वसाधारणपणे शरीरात ऑक्सिजनची मात्रा ९५% हून अधिक असणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण मानले जाते. मात्र जर शरीरात ९० %हून कमी ऑक्सिजनची लेव्हल असेल तर ते शरीरास घातक असते. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत गेली तर रुग्णांमध्ये गंभीर फरक दिसू लागतात.काही वेळेस रुग्ण दगावण्याची शक्यता असते. कमी झालेली ऑक्सिजनची मात्रा डॉक्टर कृत्रिम ऑक्सिजन देऊन वाढवू शकतात मात्र या सर्व क्रियेला मर्यादा असते.

नैसर्गिक रित्या ऑक्सिजनची मात्रा वाढवण्यासाठी हे करून पहा-
पोफळी, मनी प्लांट, स्नेक प्लांट, जरबेरा यांसारख्या झाडांची लागवड घराच्या आजुबाजूस केल्यास नैसर्गिक ऑक्सीजन मिळू शकतो. ताणतणावाचं योग्यरीत्या व्यवस्थापन करून मनाने प्रसन्न होण्याचा प्रयत्न करा, योगासने, प्राणायाम, मेडिटेशन या सर्व गोष्टींच्या सहाय्याने स्वतःचे आरोग्य जपा. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे हा कधीही सर्वोत्तम उपाय आहे. व्यायामामुळे शरीरातील पेशींना ऑक्सिजनची मात्रा योग्य प्रमाणात मिळते. नेहमी सकारात्मक विचार करा.
आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी चालणे हा सर्वोत्तम उपाय आहे. चालण्यामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढवून प्रतिकारशक्ती वाढते. दिवसभरात भरपूर पाणी प्या त्यामुळे शरीरातील कोरडेपणा कमी होऊन ऑक्सिजन वाढण्यास मदत होते.  पोषणयुक्त आहार घ्यावा. आहारात ताजा उकडलेल्या भाज्या, हिरव्या शेंगांच्या प्रकारात मोडणार्‍या भाज्यांचा मुबलक प्रमाणात समावेश करा. उकडलेला बटाटा व लीनची पाने यांमध्ये प्रोटीन असतात याचा शरीराला भरपूर फायदा होतो. शिवाय आहारात मिठाचा मर्यादीत वापर करा त्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *