सध्याच्या काळात जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा झाला आहे. पूर्वी अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा होत्या. परंतु आजच्या काळात अन्न वस्त्र निवारा यांसारख्या मूलभूत गरजा मिळविण्यासाठी पैसा ही अति मूलभूत गरज झाली आहे. त्यामुळे एका कामावर अवलंबून न राहता लोक मल्टिटास्किंग वर भर देतात. यामध्ये सर्वसामान्य लोकांसोबतच काही सेलिब्रिटींचा सुद्धा समावेश आहे. हे सेलिब्रिटी टीव्ही शों सोबतच साइड बिझनेस सुद्धा करतात. चला तर जाणून घेऊ कोण आहेत असे सेलिब्रिटी जे टीव्ही मालिकां सोबतच साईड बिजनेस द्वारे पैसा कमवतात.

रोनित रॉय – बॉलीवूड आणि टीव्ही जगतातील नामांकित अभिनेता रोनित रॉयला क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कसम से’, ‘कयामत’, ‘बंदिनी’, ‘अदालत’ आणि ’24 सीजन 2′ यांसारख्या मालिका आणि ‘खतरों के खिलाड़ी’, ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’, ‘बॉस’, ‘2 स्टेट्स’, ‘काबिल’ आणि ‘सरकार 3 यासारख्या चित्रपटांमधून पाहिले गेले आहे.
रोनित चित्रपट आणि मालिकां सोबतच सिक्युरिटी कंपनी चालवतो. रोनितच्या कंपनीचे नाव Ace सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन कंपनी असे आहे. या सिक्युरिटी एजन्सी मार्फत अमिताभ, सलमान, शाहरुख, आमिर अनेक सेलिब्रिटींना सिक्युरिटी पुरवली जाते.
आशका गोराडीया – नागिन या सुप्रसिद्ध मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेली अभिनेत्री आशका आता मालिका सोडून संपूर्ण रित्या बिझनेसवुमन झाली आहे. आशकाची स्वतःची रेनी कॉस्मेटिक्स या नावाची ब्युटी प्रॉडक्टची रेंज आहे. याव्यतिरिक्त आशका गोव्यात तिचा पती ब्रेंट सोबत योग स्टुडिओ चालवते. त्यांच्या योग स्टुडिओचे नाव पीस ऑफ ब्लू योग स्टुडिओ असे आहे.
संजिदा शेख – नामांकित टीव्ही शो क्या होगा नम्मो का, एक हसीना थी, इश्क द रंग सफेद यां मध्ये दिसलेली अभिनेत्री संजिदा शेख अभिनयासोबतच मुंबईत ब्युटी सलोन चालवते. तिच्या ब्युटी पार्लर चे नाव संजीदा पार्लर असे आहे.
करण कुंद्रा – कितनी मोहब्बत है या टीव्ही मालिकेतून टीव्ही क्षेत्रात पदार्पण करणारा अभिनेता करण कुंद्रा एका अभिनेत्यासोबत एक चांगला होस्ट सुद्धा आहे. त्याने अनेक रियालिटी शोज मध्ये काम केले आहे. करण अभिनयासोबतच जालंदर येथे इंटरनॅशनल कॉल सेंटर पण चालवतो. या व्यतिरिक्त करण त्याच्या वडिलांच्या इन्फ्रास्ट्रक्चर चा बिजनेसला हातभार लावतो. सध्या तो स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडण्याचा विचार करत आहे.
अर्जून बिजलानी – टीव्ही इंडस्ट्री मधील नामांकित नागिन व मिले जब हम तुम या मालिकेमध्ये दिसलेला प्रसिद्ध अभिनेता अर्जून बिजलानी अभिनयासोबतच मुंबईमध्ये एक प्रसिद्ध मध्य पेयाचे दुकान चालवतो. याव्यतिरिक्त अर्जुनने बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टायगर्स टीम मध्ये पैसे लावले आहेत.
रूपाली गांगोली – एकेकाळचा पॉप्युलर शो साराभाई वर्सेस साराभाई मधील मोनिषा म्हणजेच अभिनेत्री रुपाली गांगोली स्वतःची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालवते. या एजन्सीमार्फत रुपालीच्या वडिलांच्या देखरेखीखाली ऍड फिल्म तयार होतात.
अमीर अली – कहानी घर घर की या प्रसिद्ध टीव्ही मालिकेमधून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता अमीर अलीने मुंबईत स्वतःचे रेस्टॉरंट ओपन केले आहे. त्याच्या रेस्टॉरंटचे नाव बसंती असे असून हे रेस्टॉरंट शोले या चित्रपटाच्या थीमवर बनवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *