मेष रास – ग्रहांच्या अनुकूलतेमुळे ऑक्टोबर महिन्यात तुमच्या आयुष्यात चांगले परिणाम दिसून येतील. जमीन मालमत्तेशी निगडित प्रश्न सुटतील. वाहन खरेदीसाठी हा महिना अनुकूल ठरेल. कोर्टकचेरीचे निर्णय तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत मिळत आहेत. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध बनवा. या महिन्यातील तिसर्‍या आठवड्यात ग्रहांचे संक्रमण बदलामुळे दाम्पत्य जीवनात काही समस्या उद्भवू शकतात. विवाह संबंधीतील गोष्टी जुळून येण्यास विलंब लागेल. या महिन्याच्या १९ आणि २० तारखेला काळजी बाळगा.

वृषभ रास – या महिन्यात वृषभ राशीत राहूचा प्रवेश झाला असल्यामुळे तुमच्या ऊर्जाशक्ती व सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग करावा. आळसाला स्वतःपासून दूर ठेवावे. आजचे काम उद्यावर ढकलू नये. शक्य तितका वाद-विवादा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. या महिन्यात तुम्हाला नोकरीमध्ये उन्नती करण्याचा योग आहे. नवदाम्पत्याला गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या ३व ४ तारखेला काळजी घ्या.

मिथुन रास – मिथुन राशीच्या लोकांना या महिन्यातील ग्रहाचे अनुमान अनुकूल ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. प्रतिक्षित सरकारी कामे पूर्ण होऊ शकतील. व्यावसायिकांसाठी हा महिना उत्कृष्ट राहील. याशिवाय नव्या व्यवसायास प्रारंभ करण्यास देखील हा महिना उत्तम ठरू शकेल. परिवारात मंगल कार्य घडू शकेल. विवाह इच्छुकांसाठी हा महिना शुभवार्ता देणारा ठरेल. विदेशात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी नोकरीच्या संधी चालून येतील. या महिन्यातील २३ व २४ तारखेला सावधानता बाळगावी.

कर्क – या महिन्यातील ग्रहांची अनुकूलता तुम्हाला साहसी आणि पराक्रमी बनवेल.आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि केलेल्या कामाबद्दल तुमचे कौतुक होईल, तसेच जर तुम्ही तुमच्या हट्टीपणाव नियंत्रण ठेवले तर तुमच्या कामात यश मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांमध्ये किंवा भावंडांमध्ये वाद निर्माण होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा किंवा अभ्यासासाठी अनुकूल काळ आहे. उच्च अधिकाऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध तयार होतील. घर किंवा वाहन खरेदी करायचे असल्यास हा काळ अनुकूल आहे.२६ व २७ तारखेला सतर्कता बाळगावी‌.

सिंह रास – हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी भरपूर फायदेशीर ठरणार आहे. नोकरी मध्ये मानसन्मान प्राप्त होईल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ अनुकूल राहील. संततीसंबंधी च्या चिंता दूर होतील. नवदाम्पत्यांना संतती प्राप्ती चा हा योग्य काळ आहे. जोपर्यंत तुम्ही ठरवलेले कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या योजना गोपनीय ठेवा. तुमच्या सोम्य स्वभावाने तुम्ही सर्व परिस्थिती हाताळू शकाल. निवडणुकां संबंधित कोणता निर्णय घ्यायचा असेल तर हा काळ चांगला आहे. यात्रेच्या वेळी सामान चोरी होण्यापासून वाचवा. १९ व २० तारखेला काळजी घ्या.

कन्या रास – ऑक्टोबर चा पूर्ण महिना हा तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला आहे. हा का तुमच्या तब्येतीसाठी जरी प्रतिकूल आहे सोबतच व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा अनुकूल आहे. परिवारातील वरिष्ठ सदस्यांसोबत वादविवादाचे प्रसंग टाळा. पर्यटनाचा आनंद घेता येईल. आर्थिक बाजू मजबूत असेल. बराच काळ रखडलेले पैसे मिळण्याचे संकेत या महिन्यात मिळत आहेत. अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होईल. घर किंवा वाहन खरेदी करण्याचा योग या महिन्यात आहे. ३० व ३१ तारखेला काळजी घ्या.

तुळ रास – ग्रहांचे संक्रमण तुमच्यासाठी यशाची नवी शिखरे स्थापित करतील. अध्यात्मिक उन्नती होईल. धर्मासंबंधी तील कार्यात तुम्ही आवडीने सहभाग घ्याल. विदेशी मित्र किंवा नातेवाइकांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. विदेशी नागरिकते साठी अर्ज करायचा असल्यास हा काळ उत्तम राहील. सरकारी कामे पूर्ण होतील. कोर्टकचेरीच्या बाबतीतील निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. ६ व ७ तारखेला सावधानता बाळगा.

वृश्चिक रास – ग्रहांचे संक्रमण तुम्हाला अप्रत्यक्षित परिणाम मिळवून देईल. आखलेल्या योजना किंवा रणनीति सफल होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मिळेल. रखडलेली कामे पूर्णत्वास येतील मात्र यासाठी तुम्हाला मनापासून प्रयत्न करावे लागतील. जे लोक तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतील तेच लोक तुमच्या मदतीला धावून येतील. महागड्या वस्तू खरेदी कराल. विवाह संबंधित वार्तांना थोडा काळ जाऊ शकतो मात्र त्यामुळे तुम्ही हताश होऊ नका.२६ व २७ तारखेला काळजी घ्या.

धनु रास – ऑक्टोबर हा महिना तुमच्यासाठी कुठल्या वरदाना पेक्षा कमी नाही त्यामुळे या महिन्यात तुम्ही भरपूर सफलता प्राप्त करणार आहात. तुमच्या ऊर्जा शक्तीमुळे तुम्ही कठीणातल्या कठीण परिस्थितींवर नियंत्रण मिळवाल. नव्या कामाला प्रारंभ करायचा असेल किंवा कुठल्याही मोठ्या कॉन्ट्रॅक्ट वर सही करायची असेल तसेच विदेशी यात्रांसाठी विजा किंवा अन्य कागदपत्रांसाठी अर्ज करायचा असल्यास हा काळ अनुकूल राहील. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. सरकारी कामे पूर्ण होतील. संततीसंबंधी चिंता दूर होतील.११ व १२ तारखेला काळजी घ्या.

मकर रास – या महिन्यात तुम्हाला अकल्पनीय यश प्राप्त होईल.समाजातील प्रतिष्ठित किंवा उच्च अधिकाऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध तयार कराल किंवा त्यांच्याकडून अपेक्षित सहयोग मिळेल. न्यायालयीन कामात तुमच्या बाजूने निर्णय येण्याचे संकेत या महिन्यात मिळत आहेत. जी कामे पूर्ण करण्यास तुम्ही अथक प्रयत्न करत आहात ती कामे सहजतेने पूर्ण होतील. धर्म किंवा अध्यात्मा प्रति तुमची रूची वाढेल. तसेच या महिन्यात तुम्ही दान-धर्म कराल. घर किंवा वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तब्येतीची काळजी घ्या व २५ व २६ तारखेला सावधानता पाळा.

कुंभ रास – हा संपूर्ण महिना तुम्हाला संमिश्र भावनांचा जाणार आहे. त्याचप्रमाणे या महिन्यात चढ-उतार मोठ्या प्रमाणात असतील. अनेकदा तुमच्या कामात अडचणी येतील मात्र तुमच्या अथक प्रयत्नांनी तुम्ही त्या परिस्थितीवर मात कराल व त्यामुळे तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होईल. मित्र किंवा नातेवाइकांकडून अशुभ वार्ता मिळू शकते. या महिन्यात तुम्हाला खडतर प्रवास करायचा आहे. कौटुंबिक कर्तव्य पार पाडाल. विवाह संबंधित शुभवार्ता मिळेल. घरात मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. १५ व १६ तारखेला काळजी घ्या.

मीन रास – ग्रहांच्या संक्रमणामुळे तुमच्या यशात येणाऱ्या अडचणी दूर होतील. इच्छाशक्ती प्रबळ राहील. भावंडांमध्ये वाद होणार नाही याची काळजी घ्या. समाजात तुमची चांगली प्रतिमा निर्माण होईल शिवाय मोठ्या नेतृत्वाकडून सहकार्य मिळू शकते. निवडणुकांसंबधी निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. घर किंवा वाहन खरेदीचे योग या महिन्यात आहेत. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम जाईल. संततीसंबंधी प्रश्नां पासून चिंतामुक्त व्हाल. प्रेमसंबंधात यश मिळेल. १३ व १४ तारखेला सावधानता बाळगा.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *