४ ऑक्टोबर नंतर मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करणार असून १४ नोव्हेंबरला तो बाहेर पडेल. मंगळ देवाची ही उलटी फेरी अनेक राशींना अशुभ ठरू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार असे म्हटले जाते की, कोणत्याही ग्रहाची वक्र चाल अशुभ परिणाम दर्शविते. मंगळ ग्रहाला साहस, बळ, हिंसा, क्रोध यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे काही राशींना मंगळ ग्रहाची ही वक्र चाल अशुभ ठरून नोकरी- व्यापारापासून इतर क्षेत्रात देखील समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला तर जाणून घेऊ कोणत्या राशींना याचा फरक पडेल.

मेष – सबुरीने कामे करावीत. वैवाहिक जीवनात चढ-उतार येण्याची शक्यता. तब्येतीच्या बाबतीत देखील सावधानता बाळगा. तुम्ही कार्य करत असलेल्या क्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात.
वृषभ – तुम्ही कार्य करत असलेल्या क्षेत्रात निराशाजनक वातावरण निर्माण होऊ शकते. तुमच्या क्रोधाला पारावार राहणार नाही. त्याचप्रमाणे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. मात्र जमिनीसंबंधित व्यवहारात लाभ होण्याची शक्यता.
मिथुन – ऑफिस मधील वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रात अडचणी येऊ शकतात. त्याचप्रमाणे कार्य करण्याच्या पद्धतीत बदल होणार आहेत. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

कर्क – या महिन्यात तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. या काळात तुमच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे.
सिंह – गुढ वैज्ञानिक रहस्यात तुमची रूची वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीत नुकसान होण्याची शक्यता. भावना संमिश्र राहतील. या काळात तुम्हाला प्रत्यक्षित लाभ होण्याची शक्यता आहे.
कन्या – भागीदारीमध्ये व्यापारात तोटा होऊ शकतो. एखाद्याबरोबर नवीन कार्य सुरू करणे योग्य ठरणार नाही. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

तूळ – कामाच्या ठिकाणी कामाचा दबाव अधिक असेल. शत्रूंची संख्या वाढू शकते. तब्येतीत सुधारणा होईल. या काळात रिअल इस्टेटमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील आहे. मात्र व्यवसायातील चढ-उतारांची परिस्थिती कायम राहील.
वृश्चिक – अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणात गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल नाही. प्रिय व्यक्तींसोबत वाद-विवाद होण्याची शक्यता.
धनु – वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या. त्यांच्यासोबत सलोख्याचे संबंध राखा. सुखकारक गोष्टींमध्ये अडचणी येऊ शकतात. नवे कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ ठरू शकेल.

मकर – मानसिक संतुलन बिघडू शकते. लहान भावंडांसोबत एखादा कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे. तुमचे साहस व पराक्रम कुठेतरी कमी पडू शकते त्यामुळे सावधगिरीने काम करा.
कुंभ – कोणासोबत तरी वाद होण्याचे चिन्ह या काळात दिसत आहे. कुटूंबातील सदस्यांमध्ये वाद होऊ शकतात. पैशांची बचत करणे कठीण जाईल. व्यापारात लाभ मिळण्याची शक्यता.
मीन- वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत शक्यता आहे. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. या काळात मानसिक त्रास संभवतो.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *