बॉलीवूडने चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार कलाकार दिले आहे. ज्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. ८० आणि ९० च्या दशकातील असे अनेक सुपरस्टार आहे ज्यांचा बॉलीवूड वर दबदबा अजूनही कायम आहे. बॉलीवूड मध्ये असा एक अभिनेता आहे ज्याचे बालपण मुंबईतील चाळीमध्ये गेले. हा अभिनेता लहानपणी स्वतःचे घर चालवण्यासाठी शेंगदाणे विकायचा. त्यानंतर सिनेमागृहा बाहेर ब्लॅ क मध्ये चित्रपटाची तिकिटे विकता विकता तो स्वतः मोठ्या पडद्याचा सुपरस्टार झाला.
आम्ही ज्या बॉलिवूड अभिनेत्या बद्दल बोलत आहोत तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून जॅकी श्रॉफ आहे. जॅकी श्रॉफ हे बॉलीवूडचे एक नामांकित अभिनेता आहेत. जॅकी श्रॉफ यांनी मोठ्या पडद्याची ४० वर्षे गाजवली. या ४० वर्षात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून सुपरहिट चा बोर्ड लावला. बॉलीवूड सृष्टीतील जॅकी श्रॉफ हे एक असे अभिनेता आहेत जे वाद-विवादांपासून नेहमीच दूर राहीले.
जॅकी श्रॉफ यांनी बॉलिवूडमध्ये आतापर्यंत २२० चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. काही दिवसांपूर्वी जॅकी श्रॉफ साऊथचा सुपरस्टार प्रभास सोबत साहो या चित्रपटात दिसले होते. जॅकी श्रॉफ यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५७ मध्ये झाला होता. त्यांचे वडील काकू भाई श्रॉफ हे गुजरात मध्ये बिझनेस मॅन होते. तर त्यांची आई रिटा श्रॉफ या तुर्किश होत्या. जॅकी श्रॉफच्या वडिलांना बिजनेस मध्ये नुकसान झाले. ते संपूर्णतः कर्जात बुडाले. त्यानंतर जॅकी श्रॉफ च्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. त्यानंतर जॅकी श्रॉफ मुंबई आले व त्यांनी खूप संघर्ष केला.
जॅकी श्रॉफ यांचे खरे नाव जय किशन काकू भाई असे होते. मुंबईत आल्यानंतर ते एका चाळीत राहत होते. त्यावेळी त्यांनी ट्रॅव्हल एजन्सी मध्ये काम केले. एक दिवस एका व्यक्ती त्यांना पाहून म्हणाला की तुम्ही एखाद्या हिरो प्रमाणे दिसता. तुम्हाला तर चित्रपटांमध्ये काम केले पाहिजे. त्यानंतर जॅकी श्रॉफ यांनी चित्रपटात करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुद्धा त्यांनी भरपूर कष्ट घेतले आणि सरतेशेवटी त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !