प्रेम हे आंधळ असतं याचा खरा प्रत्यय सिनेजगतातील कलाकारांना व त्यांच्या जोडीदारांना पाहून नक्कीच येतो. सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी स्वतःपेक्षा लहान जोडीदाराची लग्न केले आहे. काहींनी तर स्वतःच्या मुलीच्या वयाच्या सलेल्या जोडीदाराशी लग्न केले आहे. तर आज अशाच काही कलाकारांबद्दल व त्यांच्या जोडीदाराबद्दल जाणून घेणार आहोत.

1. सलमान- ईयूलिया – बॉलिवूडमधील भाईजान म्हणजेच सलमान खान हा त्याचा अभिनयासोबत त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रियसींमुळे देखील चर्चेत असतो. सलमान खानचे आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे. सध्या रोमानियाची असलेली ईयूलिया वंतूर हिच्यासोबत सलमानचे नाव जोडले आहे. ईयूलिया वंतूर ही सलमान पेक्षा तब्बल १४ वर्षांनी लहान आहे. ५४ वर्षाचा सलमान व ४० वर्षाची ईयूलिया एकमेकांच्या प्रेमात आहेत. या दोघांचे नाव जोडले असले तरी अधिकृत अशी लग्नाची खबर नाही.
2. मिलिंद सोमण-अंकिता – मिलिंद सोमण हा भारतीय मॉडेल, अभिनेता आणि फिटनेस प्रवर्तक आहे. मिलिंद सोमण यांच्या अभिनय कारकिर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चा होते. मिलिंद सोमण यांनी २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री मायलेन जाम्पानो हिच्याशी लग्न केले पण २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. २०१८ मध्ये मिलिंद सोमणने अंकिता कोंवर सोबत अलिबाग येथे लग्न केलं. मिलिंद सोमण यांच वय ५५ आहे तर अंकिता ही २९ वर्षांची आहे.
3. धर्मेंद्र -हेमा मालिनी – ९०च्या शतकातातील हीमैन धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हे दोन दिग्गज देखील याचा भाग आहेत. या दोघांमध्ये १३ वर्षांचे अंतर आहे. धर्मेंद्र यांनी १९५४ साली वयाचा १९ व्या वर्षी परकाश कौर यांच्यासोबत लग्न केले, त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी हेमा मालिनी सोबत लग्न केले. त्यांना एकूण ७ अपत्ये आहेत.
4. राजेश खन्ना- डिंपल कपाड़िया – वयाचा मुद्दा आला की दिगज्ज कलाकार राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांचं नाव विसरून चालणार नाही. बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना डिंपल यांना फार कमी वयातच आवडले होते. डिंपल यांनी वयाचा १६ व्या वर्षी ३१ वर्षाच्या राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केले. त्याआधी डिंपल यांनी १४ व्या वर्षी राज कपूर यांच्यासोबत लग्न केले होते.
5. कबीर बेदी -परवीन दुसांज – वयाच्या ६९ आपल्या मुलीपेक्षा ४ वर्षे लहान असलेल्या परवीन दुसांजसोबत कबीर बेदी यांनी चौथं लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कबीर बेदी यांनी आतापर्यंत ४ लग्न केली आहेत. कबीर बेदी आणि परवीन दुसांज यांच्यामध्ये २९ वर्षांचा फरक आहे. कबीर बेदी यांनी परवीनसोबत लग्न केलेले त्यांची मुलगी पूजा बेदी हिला आवडले नव्हते. तिने परवीनला चुडैल असे ही संबोधले होते.

6. संजय दत्त – मान्यता दत्त – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याने २००८ मध्ये मान्यता दत्त सोबत लग्न केले. त्यांना 2 मुले आहेत. या दोघांमध्ये १९ वर्षांचा फरक आहे. मान्यतासोबतचे लग्न संजय दत्तच्या बहिणींना पटले नव्हते, त्यामुळे मान्यताला घरी स्वतःची पत्नी व सून म्हणून आणण्यासाठी संजय दत्तला फार अवघड पडले होते. आत्तापर्यंत संजय ने ३ लग्न केली आहेत.
7. रणबीर कपूर – आलिया भट्ट – बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक म्हणजे रणबीर आणि आलिया भट्ट होय. दोघांमध्ये तब्बल १० वर्षांचा फरक आहे. दोघांच्या लग्नाबद्दलच्या चर्चेला उधाण येत आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या रिलीजनंतर दोघांचे लग्न होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.
8. शाहिद कपूर- मीरा कपूर – बॉलीवूडमधील कबीर सिंग म्हणजे शाहिद कपूर याने २३ वर्षाच्या मीरा सोबत लग्न केले. शाहिद व मीरामध्ये १४ वर्षांचा फरक आहे. “एज इज जस्ट ए नंबर” हे अगदी द्ध केलं आहे. आता या दोघांना १ मुलगा व १ मुलगी आहे.
9. सैफ अली खान-करीना कपूर – बॉलीवूडमधील बेबोने २०१२ मध्ये सैफ अली खान सोबत लग्न केले. सैफ अली खानचे हे दुसरे लग्न असून सैफ आणि करीनामध्ये ११ वर्षांचा फरक आहे. हे दोघे आपल्या वैवाहिक जीवनात खुश असून त्यांना तैमूर नावाचा मुलगा आहे. लवकरच त्यांच्याकडे नवा पाहुणा देखील येणार आहे.
10. दिलीप कुमार-सायरा बानो – हिंदी चित्रपट सृष्टीतील मोठं नाव म्हणजे दिलीप कुमार. दिलीप कुमार यांना कोहिनुर म्हणून संबोधणाऱ्या सायरा बनो या वयाच्या १२ वर्षी दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या.सायरा बनो २२ वर्षाच्या असताना त्यांनी ४४ वर्षाच्या दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न केले. दोघांमध्ये २२ वर्षांचा फरक असला तरी त्यांचा प्रेमात कधीच अडथळा आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *