सोशल मीडियावर काही ना काही नवा ट्रेंड हा सुरु असतोच. आज हे चॅलेंज तर उद्या ते चॅलेंज. हल्लीचा नवीन ट्रेंड म्हणजे तुम्हाला एक फोटो दाखवला जातो आणि त्या फोटोमध्ये लपलेले प्राणी शोधण्यासाठी सांगितलं जातं. हा खेळ खेळल्याने आपल्या मेंदूचा व डोळ्यांचा खूप चांगला व्यायाम होतो. आज आपण अशाच एका गेम बद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये आपल्याला एक फोटो दाखवला आहे त्यात फोटोमध्ये लपलेली पाल आपल्याला शोधायची आहे.
या फोटोमध्ये तुम्हाला मोठे डोंगर, झाडं-झुडुपं आणि काटे इत्यादी गोष्टी दिसत असतील. पण जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर यामध्ये तुम्हाला एक लपलेली पाल सुद्धा दिसेल. बघा बरं दिसते आहे का? चला एक हिंट बघूया. या फोटोतील पाल ही जमिनीवर आहे. नसेल दिसली तर या फोटोमधली पाल कुठे आहे हे आपण आता पाहूया.
हा फोटो @Afro_Herper नाव असलेल्या एका वापरकर्त्याने ट्विटरवर शेयर केला होता. त्याने आपल्या फॉलोवर्स ला सांगितले की या फोटोमध्ये लपलेली पाल शोधून सांगा. पण बहुतांश लोक या फोटोमध्ये पाल शोधण्यात तितके यशस्वी ठरले नाहीत. अनेक जणांनी खूप प्रयत्न केले पण तरीही त्यांना योग्य उत्तर देता आले नाही. अनेकांना जीवा या फोटो मधली पाल स्वतःला आली नाही तेव्हा त्यांनी त्या वापरकर्त्याला यासंबंधित प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याने ट्विट करून या प्रश्नाचं खरं उत्तर देखील सांगितलं.
या फोटोमध्ये पाल हे जमिनीच्या मध्यभागी दगडांमध्ये लपलेली आहे. कारण या फोटोमधील दगडांचा रंग व पालीचा रंग हा जवळजवळ सारखाच आहे, त्यामुळे कोणालाही लगेच ती पाल नजरेस पडली नाही. यासारखे बुद्धीला व डोळ्यांना चालना देणारे खेळ नक्कीच खेळले गेले पाहिजेत. रोजच्या त्रासदायक जीवनातून थोडा विरंगुळा देखील होतो आणि आपण किती जलद बायकांची गोष्ट छान निरखून पाहून सांगू शकतो हे देखील आपल्याला समजते.