टीव्ही इंडस्ट्री मध्ये आपल्याला जसजशा नवीन मालिका येत जातात तशा नवोदित अभिनेत्री पाहण्यास मिळतात. आणि या अभिनेत्री काही दिवसातच प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यास यशस्वी होतात. अभिनेत्री शिवांगी जोशी बाबत देखील असेच काहीसे घडले. तिने अवघ्या काही दिवसातच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे विशेष स्थान बनवले. शिवांगी तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या स्टाइलिश लुकसाठी सुद्धा ओळखले जाते.

सध्या शिवांगी ची ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत ती नायराचे पात्र साकारत आहे. शिवांगी आता २० वर्षाची असून इंडस्ट्रीमध्ये तिने टॉपची अभिनेत्री म्हणून नाव केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवांगी सध्या तिचा को-स्टार मोहसीन खान ला डेट करत आहे. एवढेच नव्हे तर असे सुद्धा म्हटले जाते की ते दोघे सध्या लिव्ह इन मध्ये राहतात.

नायरा म्हणजेच शिवांगी च्या ओन स्क्रीन आयुष्याबद्दल तर सर्वजण जाणतात मात्र आज या पोस्ट द्वारे आम्ही तुम्हाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला माहित आहे का की नायरा म्हणजेच शिवांगी जोशी ला एक सुंदर छोटी बहिण आहे. तिची छोटी वहि तिच्या प्रमाणेच दिसायला एकदम सुंदर आणि स्टायलिश आहे.

खरेतर शिवांगी छोट्या बहिणीला लाईमलाईटमध्ये राहणे जास्त पसंत नाही. कदाचित याच कारणामुळे लोक तिला फारसे ओळखत नाहीत. चला तर मग आम्ही तुम्हाला तिच्या लहान बहिणी बद्दल काही गोष्टी सांगतो. शिवांगी च्या छोट्या बहिणीचे नाव शितल आहे. शितल अनेकदा शिवांगी सोबत पार्ट्यांमध्ये दिसते.

मात्र त्यावेळी देखील ती शिवांगी ची बहिण आहे हे कोणाला कळत नाही. सुंदर आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीची बहिण असून देखील शितल टीव्ही इंडस्ट्री पासून दूर राहते. शितलचे फोटो पाहून कोणीही म्हणेल की शितल जर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आली तर ती तिच्या बहिणीप्रमाणेच टीव्ही इंडस्ट्री गाजवेल.
शितल तिच्या बहिणीप्रमाणे खूप ग्लॅमरस आहे. विशेष म्हणजे दोघी बहिणी एकमेकींवर भरपूर प्रेम करतात. शिवांगी ने एका इंटरव्यू मध्ये सांगितले होते की त्या दोघी एकमेकींसोबत खूप मस्ती करतात आणि एकमेकींसोबत त्यांच्या वस्तू शेअर करतात. मग ते ड्रेस, पर्स किंवा चप्पल असो. अनेकदा या दोघी सारख्या कपड्यां मध्ये दिसल्या आहेत.

शिवांगी चे शूटिंग जेव्हा बंद असते तेव्हा ती मिळालेला वेळ तिच्या बहिणीसोबत घालवणे पसंत करते. शिवांगी च्या म्हणण्यानुसार त्या दोघी बहिणी कमी आणि मैत्रिणी जास्त आहे. दोघी एकमेकींसोबत लहान-सहान गोष्टी शेअर करतात. पार्टीज आणि अवॉर्ड फंक्शनमध्ये दोघी अनेकदा एकत्र दिसतात.

शिवांगी तर छोटा पडदा गाजवत आहे. मात्र तिची बहीण छोट्या पडद्यावर पदार्पण कधी करेल हे सांगता येत नाही.शिवांगी नाही याबद्दल सांगितले की सध्या तरी तिच्या बहिणीचे अभिनय क्षेत्रात येण्याचे मन नाही. मात्र कदाचित पुढे ती याबाबत विचार करू शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *