लग्नानंतर पती पत्नीचे नाते साताजन्माच्या असते म्हणतात. मात्र सध्याच्या आधुनिक युगात हे नाते एक जन्म जरी टिकले तरी अति उत्तम. या आधुनिक युगात पती-पत्नीमधील नात्यात दुरावे वाढू लागले आहे. या कारणांमुळे सध्या घ*ट*स्फो*टा*चे प्रमाण वाढले. घ*ट*स्फो*टा*चे प्रमुख कारण म्हणजे पती-पत्नींमध्ये आधीसारखी प्रेम न उरणे. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असे काही घडण्याची भीती असेल तर काळजी करण्याचे कारण नाही.आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत जेणेकरून तुमची पत्नी तुम्हाला सोडुन कधीच जाणार नाही. यामुळे ती तुमच्याकडे कधीच घ*ट*स्फो*टा*ची मागणी करणार नाही किंवा परपुरुषासोबत अफेअर करणार नाही. ती केवळ तुमच्यावर मनापासून प्रेम करेल.
गुड मॉर्निंग किस-
सध्याच्या जमान्यात लोक इतके व्यस्त असतात की सकाळी उठल्यावर थेट ऑफिसला जायची तयारी करतात. सकाळी उठल्यावर त्यांना नीट आपल्या पत्नीशी बोलायला पुरेसा वेळ देखील नसतो. ही गोष्ट तुमच्या पत्नीला असुरक्षित वाटण्यास मदत करते. असे होऊ नये यासाठी तुम्ही जेव्हा सकाळी उठाल तेव्हा तुमच्या पत्नीला गुड मॉर्निंग किस नक्की द्या. लक्षात ठेवा असे तुम्हाला दररोज करायचे आहे. एक दिवस सुद्धा चुकवू नका. तुमच्या लग्नाला किती वर्षे उलटून गेली तरीही तुमची ही सवय कधीच सुटू देऊ नका. मग पहा तुमच्या दोघांमधील प्रेम आजन्म तसेच राहील.
दोन क्षणांसाठी प्रेमळ बोलणे-
रोमान्स व्यतिरिक्त पत्नीशी थोडावेळ प्रेमाने बोलल्यास तिला भरपूर काही देऊन जाते. असे केल्यास तुमची दोन्ही मने एकमेकांच्या जवळ येण्यास मदत करतात. रोज सकाळी उठल्यावर डोळे उघडताच तुमच्या पत्नीशी थोडावेळ प्रेमाने बोला. मग हे बोलणे भलेही ५ मिनिटांचे का असो ते करण्यास विसरू नका. यामुळे पत्नीला खात्री पटते की तिचा पती केवळ शारीरिक सुखासाठी नाही तर मनापासून तिच्यावर प्रेम करतो. असे झाल्यास पत्नी तुमच्यावर मनापासून प्रेम करेल आणि कधीच कोणासोबत अफेअर करणार नाही.
सोबत ब्रेकफास्ट-
साधारणतः अनेक घरांमध्ये पती सकाळी ऑफिस साठी जातो ते थेट रात्री घरी येतो. त्यामुळे पतीला खाण्यापिण्यासाठी किंवा अन्य गोष्टींसाठी पत्नीसोबत वेळ मिळत नाही. पती कामाला निघून गेल्यावर पत्नी घरात एकटीच असते. त्यामुळे तुम्ही सकाळचा नाष्टा तिच्यासोबत गेल्यास तेदेखील दिला सुखावून जाते. यानंतर तिला दिवसभरासाठी एक वेगळीच ऊर्जा मिळते. रविवार किंवा जेव्हा-केव्हा पतीला सुट्टी असेल त्यावेळी त्याने स्वतः पत्नीसाठी ब्रेकफास्ट बनवावा. यामुळे तुम्हाला तुमच्या पत्नीची किती काळजी आहे हे दिसून येईल. तुम्ही तिला लग्न करून केवळ काम करण्यासाठी आणले नाही याची तिला जाणीव होईल. त्यामुळे एकमेकांच्या जवळ येण्यास मदत होईल. शिवाय पत्नीच्या नजरेत तुमची किंमत वाढेल.
जर तुम्ही दररोज या तीन गोष्टी कराल तर तुमची पत्नी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही.