बॉलीवूड कलाकार मोठ्या पडद्यावर त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवून प्रेक्षकांची मने जिंकून घेतात. मात्र अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्यामध्ये काही कौशल्य देखील आहेत जी प्रेक्षकांना ठाऊक नाहीत. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे अभिनयासोबत वेगळे टॅलेंट सुद्धा आहे. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मार्फत अभिनेते आणि अभिनेत्रींच्या काही कलागुणांबद्दल सांगणार आहोत प्रेक्षकांना माहीत नाहीत.
1. आमिर खान – थ्री इडीयट्स, लगान, दंगल, गजनी यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणारा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान अभिनयात मास्टर आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. मात्र एक उत्कृष्ट अभिनेता सोबतच आमिर खान एक उत्तम बुद्धिबळपटू आहे. सेटवर वेळ मिळेल तसा अमीर खान बुद्धिबळ खेळायला बसतो. एवढेच नव्हे तर अमीर खान बुद्धिबळातील मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वनाथ आनंद सोबत देखील बुद्धिबळ खेळले आहे.
2. सलमान खान – बॉलीवूड च्या भाईजान च्या अभिनयाचा चाहता जगाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतो. भाईजान ची एक झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स तरसत असतात. सलमान खानच्या नावानेच बॉक्स ऑफिस हाऊसफुल होऊन जातो. असा हा सलमान खान अभिनयासोबतच उत्कृष्ट पेंटिंग देखील करतो. सलमान खानने अनेकदा सोशल मीडियावर त्याचे पेंटिंग्स टाकले आहेत. त्याचीही दुसरी बाजू पाहून त्याचे अनेक चाहाते अवाक झाले. सलमान खान ला चित्रपटांच्या चित्रीकरणातून वेळ मिळतो त्या वेळेस तो पेंटिंग काढण्यात मग्न होतो.
3. अक्षय कुमार – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मध्ये टॅलेंटचे भांडार आहे असे म्हटल्यास हरकत नाही. अक्षय कुमार उत्कृष्ट अभिनेत्याचा सोबतच एक उत्तम कुक सुद्धा आहे. चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी अक्षय कुमार थायलंडमधील एका हॉटेलमध्ये काम करायचा. त्यामुळे अक्षय कुमारने जेवण बनवणे तेथूनच शिकले.
4. यामी गौतम – बॉलीवूड मधील सौंदर्यवती अभिनेत्री यामी गौतम चित्रपटां सोबतच वेगवेगळ्या जाहिरातीं मध्ये देखील दिसते. यामी ने विकी कौशल सोबत उरी या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरपूर कौतुक केले. मात्र यामी गौतम ची दुसरी बाजू बऱ्याच जणांना ठाऊक नाही ती म्हणजे यामी अभिनेत्री सोबतच एक इंटेरिअर डिझायनर आहे. त्यामुळे स्वतःच्या घराचे इंटेरियर तयार करण्यासाठी तिला दुसऱ्या कोणा इंटिरियर डिझायनरची गरज पडली नाही. तिने स्वतःचे घर स्वतः इंटेरियर करून घेतले होते.
5. सोनाक्षी सिन्हा – सलमान खान सोबत चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारी दबंग गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सलमान खान प्रमाणेच उत्कृष्ट पेंटर आहे. लॉक डाऊन मध्ये सर्व उद्योगधंद्यात सोबतच चित्रपटसृष्टीतील कामदेखील थांबवण्यात आले होते त्यामुळे फावल्या वेळेत सोनाक्षीने बऱ्याच पेंटिंग काढल्या व त्या ऑनलाईन विकल्या.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !