आपल्याकडे सर्व सोईसुविधा धन दौलत असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र प्रत्येकाला हे सुख मिळतेच असे नाही. काही कारणास्तव अनेकांच्या आयुष्यात पैशांवरुन बरेच वाईट परिस्थिती उद्भवते. भरपूर प्रयत्न करून देखील आर्थिक समस्या दूर होत नाही त्यामुळे घरात नेहमीच पैशांची चणचण असते. या समस्यांपासून मुक्तता करायचे असल्यास वास्तु संबंधित काही उपाय करून पहा ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. चला तर जाणून घेऊन आर्थिक समस्या दूर करण्यासाठी वास्तू संबंधित कोणते उपाय करायचे.

तिजोरी – वास्तुशास्त्रानुसार पैसे ठेवायची जागा ही योग्य दिशेला असणे आवश्यक असते. जर तुमची तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा चुकीच्या दिशेला असल्यास किंवा चुकीच्या दिशेला उघडत असल्यास तुमच्याकडे पैसा टिकणार नाही. त्यामुळे पैसे ठेवण्यासाठी वापरात येणारी तिजोरीचे तोंड उत्तर दिशेला उघडेल असे ठेवावे. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला कुबेराची दिशा म्हटले जाते. यामुळे अनावश्यक खर्च कमी होतो ज्यामुळे पैशांची साठवणूक होते.
पाणी – ज्या घरात पाणी सतत वाहत असते किंवा नळ टपकत असते तेथे सुद्धा पैसा टिकत नाही. पैसा पाण्यासारखा वाहून निघून जातो असे म्हटले जाते त्यामुळे घरातील नळ कायम नीट बंद ठेवला पाहिजे. पाण्याचा अनावश्यक वापर करू नये. जर तुमच्या घरातील नळ तुटल्यामुळे त्यातून पाणी गळत असेल तर तो नळ लगेच दुरुस्त करून घ्या.
आरसा – घरात तुटलेला आरसा किंवा कुठलीही वस्तू ठेवल्यास घरात नकारात्मकता वाढते ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

कचरा – तुमच्या घराच्या छपरावर कधीही कचरा साठू देऊ नये. यामुळे पैशांच्या संबंधित अडचणी निर्माण होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *