सध्याच्या धावपळीच्या युगात स्वतःकडे पुरेसे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. सकाळी उठल्यावर दात घासून झाले आणि इतर सकाळची दिनचर्या आटपली की आपण आपल्या कामात व्यस्त होऊन जातो त्यामुळे आपल्याला स्वतःकडे नीट लक्ष देता येत नाही. अशावेळी केवळ दात घासले म्हणजे ते मजबूत झाले असे होत नाही यासाठी आपल्या आहारात सुद्धा योग्य पदार्थांचा समावेश असणे गरजेचे असते.

महत्त्वाची बाब म्हणजे संतुलित आहार चावण्यासाठी मजबूत दातांची गरज असते. परंतु जर दातांमध्ये काही त्रास असल्यास एखादी गोष्ट चावण्यास आपल्याला भरपूर कष्ट घ्यावे लागतात. त्यावेळी आपल्याला द्रवपदार्थ यांवर अवलंबून राहावे लागते. वय झाल्यावर दात तुटणे किंवा कमजोर होणे हे नैसर्गिक आहे. मात्र कमी वयात दातांची समस्या उद्भवू नये हे चिंताजनक आहे. यासाठी दातांची योग्य रित्या देखभाल केली पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या डायटमध्ये या पाच गोष्टींचा समावेश करावा.

विटामिन सी युक्त फळ आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा – कोरोना च्या काळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनण्यासाठी डॉक्टर सतत विटामिन सी युक्त भाज्या आणि फळे खाण्याचा सल्ला देत होते. सोबत असल्यामुळे दात आणि हिरड्या सुद्धा मजबूत होतात. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात संत्री, लिंबू, किवी,फ्लॉवर आणि कोबी या भाज्या व फळांचा समावेश करावा.

दुग्धजन्य पदार्थ खावेत – तुमच्या डायटमध्ये दुधापासून बनलेल्या दही, पनीर यांसारख्या पदार्थांचा अवश्य समावेश करावा. यामध्ये विटामिन सी सोबतच कॅल्शिअम देखील असते. याच्या सेवनामुळे हाडे मजबूत होतात.
अंडे खावे – अंड हे प्रोटीन्सचे प्रमुख स्त्रोत आहे. यामध्ये विटामिन सी सोबतच कॅल्शिअम देखील असते.दातांना मजबूत आणि स्वस्थ ठेवण्यासाठी तुमच्या आहारात अंड्याचा समावेश अवश्य करावा.

पाणी भरपूर प्या – पाणी हा आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण घटक असतो. पाण्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. पाण्यामध्ये अनेक पौष्टिक घटक आढळतात ते आपल्या शरीरास उपयुक्त असतात. यामुळे आपले आरोग्य सुद्धा सुधारते. तसेच आपले शरीर हायड्रेट राहते.

ग्रीन टी चे सेवन करा – ग्रीन टी मध्ये एंटीऑ’क्सि’डेंट्स चे गुण असतात. ग्रीन टी मुळे केवळ वजन कमी होत नाही तर सोबतच तोंडात जिवाणूं चा प्रसार होण्यापासून ते रोखते. यामुळे दात व हिरड्या मध्ये होणाऱ्या समस्येचा धोका कमी होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *